Monday, July 1, 2024
Homeमहत्वाची बातमीमुख्यमंत्रीपदासाठी मीच उद्धव यांचा हात वर केला

मुख्यमंत्रीपदासाठी मीच उद्धव यांचा हात वर केला

पुणे (प्रतिनिधी) : दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता, त्यावेळेस मीच उद्धव ठाकरे यांचा हात धरत हेच मुख्यमंत्री होतील असे आमदारांच्या बैठकीत सांगितले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असून शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी का बसवले नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी याबाबतचा घटनाक्रम मांडला.

राज्यात आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता. सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल हे सर्वांनी एकमताने मान्य केले होते. मी ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत नेतृत्व कुणी करायचे, यासंबंधी दोन-तीन नावे आमच्याकडे आलेली होती. सुरुवातीला उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदास त्यांनी नकार दिला होता. त्यांना अक्षरश: सक्तीने मी त्यांना हात वर करायला लावला. मी त्यांचा हातवर केल्याने त्यांनी नेतृत्व स्वीकारले. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरे यांचा हात वर केला, असे शरद पवार म्हणाले.

मोदी सरकारला सल्ला

शेतकरी आंदोलनात पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश तसेच राजस्थानच्या काही भागातील जास्तीत जास्त लोक सहभागी आहेत. त्यातल्या त्यात पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आमचे केंद्र सरकारला सांगणं आहे की पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, असा सल्ला त्यांनी मोदी सरकारला दिला. एकदा देशाने अस्वस्थ पंजाबची किंमत दिली आहे. ही किंमत इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत दिली आहे, असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -