परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यात भातापिकाचे नुकसान



नेरळ : कर्जत तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा बेभरावसा आणि अल्प पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी कमी कालावधीत तयार होणारे भाताचे बियाणे वापरून त्याची लागवड करतात. दरम्यान, गणपती उत्सवानंतर तयार झालेले भाताचे पीक परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने भातपिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.


कर्जत तालुक्यात यावर्षी ८९६४ हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली आहे. प्रामुख्याने पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन शेतकरी भाताचे बियाणे निवडत असतात. मात्र परतीचा पाऊस लांबल्याने शेतात उभे असलेले भाताच्या पीकाचे नुकसान होत आहे. हस्त नक्षत्र कालावधी संपल्यानंतर भाताचे पीक काढणीस तयार होईल असे नियोजन शेतकरी करीत असतात, त्यानुसार साधारण १२० दिवसात म्हणजे तीन महिन्यात तयार होणारे वाण बियाणे म्हणून वापरत असतात.


जून महिन्यात शेतकऱ्यांनी बियाणांची राब भरणी केली. सप्टेंबर अखेरिस पीक तयार झाले असून परतीचा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. तसेच वादळीवाऱ्यामुळे शेतपीकांचे मोठे नुकसान होत आहे. कर्जत तालुक्यातील ही स्थिती दुबार भातशेती करणारा राजानाला कालवा परिसर वगळता अन्य सर्व भागात शेतात भाताचे पीक तयार झाले आहे. त्यामुळे ते भाताचे पीक कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. भाताचे पीक शेतातच कुजून जात असल्याने शेतकरी वर्ग संकटात आला आहे.


त्यामुळे कर्जाच्या खाईत लोटलेल्या भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मंचाने कर्जत तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भाताच्या पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे. शेतकरी मंचाचे अध्यक्ष विनय वेखंडे यांनी आपल्या भागातील भाताच्या पिकाची स्थिती ही महापुराने अधिक नेस्तनाबूत झाल्याचे म्हटले आहे. त्यात आता सरता पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आणि त्यामुळे भाताच्या शेतीचे होणारे नुकसान टाळणे शक्य नाही अशी कैफियत मांडली आहे.


आम्ही शेतकरी मंचाचे शेतकरी यांनी गेली काही वर्षे पडणारा पाऊस लक्षात घेऊन साधारण १२० दिवसात तयार होणारे भाताचे पीक आपल्या शेतात लावले आहे. जास्त उत्पादन देणारा कर्जत ७ आणि जास्त उत्पन्न देणारा काळा तांदूळ तयार करण्याचे प्रयत्न परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. शेतात कोसळलेली भाताची पिके यांना शेतात असलेल्या पाण्यामुळे मोड आले आहेत, तर काही कुजून जात आहेत. - शशिकांत मोहिते-प्रगतशील शेतकरी, बोर्ले


आमच्याकडे जिल्हाधिकारी कार्यकायकडून नुकसानग्रस्त भाताच्या पिकाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.त्यानुसार तालुका तहसीलदार यांच्या पत्रकाप्रमाणे कृषी विभाग,महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. - शीतल शेवाळे, तालुका कृषी अधिकारी

Comments
Add Comment

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या