तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी चालवलेला खेळ निंदनीय

मुंबई : मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "कोरोनाचे निमित्त साधून या तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवला आहे तो निंदनीय आहे" असे म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच "शिक्षणद्रोही सरकारला लवकर सुबुद्धी येवो आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटोत" अशी प्रार्थना देखील मनसेने देवीकडे केली आहे.


https://twitter.com/ThakareShalini/status/1448522151070343171

शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. "आज दीड वर्षांनी शाळा उघडतायत मात्र शाळा सुरू नसतानाही खाजगी शाळांनी पालकांकडून सर्रास फी घेऊन लूट माजवली. एमपीएससी आणि इतर महत्त्वांच्या परीक्षांचा सावळा गोंधळ तर अजूनही सुटला नाही, परिणामी सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य अजूनही अंधारातच आहे. त्याची जबाबदारी हे सरकार कधी घेणार? कोरोनाचं निमित्त साधून या तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवला आहे तो निंदनीय आहे. दरदिवशी वेगवेगळे मंत्री वेगवेगळे निर्णय घेऊन विद्यार्थी आणि पालक यांना अजूनच बुचकळ्यात पाडत आहेत" असे त्यांनी म्हटले आहे.


"आई, आज तुझ्या माध्यमातून या शिक्षणद्रोही सरकारला लवकर सुबुद्धी येवो आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटोत अशी प्रार्थना करते...



"आई माझी अशी..
हाकेला धाव ग..
शिक्षणाचा झाला आमच्या
पुरता खेळखंडोबा ग..
कोण काय निर्णय घेते
याचा ना कुणाला मेळ ग..
तूच आता हातात घे छडी
आणि दे यांना शिक्षा ग..""


असे शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


https://twitter.com/ThakareShalini/status/1448522169206521859
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून