Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरडहाणूच्या समुद्रात १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

डहाणूच्या समुद्रात १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

तटरक्षक दलाच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मृतदेह शोधण्यात यश

बोईसर (वार्ताहर) : डहाणूजवळील नरपड येथील समुद्रात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या ओम किशोर म्हात्रे (वय १३) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. डहाणू पोलिसांनी तटरक्षक दलाच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह शोधण्यात यश मिळवले.

ओम हा डहाणूच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता. उन्हाळी सुट्टी असल्यामुळे ओम शुक्रवारी दुपारी चार मित्रांसह जवळील समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. बराच वेळ होऊनही ओम घरी न परतल्याने त्याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केल्यावर ओम हा समुद्रात बुडाला आहे असे त्याच्यासोबत असलेल्या घाबरलेल्या मित्रांनी रात्री उशिरा सांगितले.

ओमला शोधण्याची मोहीम दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी डहाणू पोलीस स्टेशनचे निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, जीवरक्षक, स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुरू केली. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने शोधमोहिमेत अडथळे येत होते. दुपारी पुन्हा भरती सुरू झाल्यावर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोध सुरू केला असता संध्याकाळच्या सुमारास डहाणू आगर किनाऱ्याजवळ ओमचा मृतदेह सापडला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -