Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीराज्यात आणखी १० ओमायक्रॉन रुग्णांची नोंद

राज्यात आणखी १० ओमायक्रॉन रुग्णांची नोंद

मुंबई : जगभरामध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन विषाणूचा मोठ्या संख्येने प्रादुर्भाव होताना दिसत आहे. भारतामध्येही आतापर्यंत या विषाणूचे २३ रुग्ण आढळून आले होते. त्यात आणखी दहा जणांची भर पडली आहे. चिंताजनक म्हणजे एकट्या महाराष्ट्रातच आज ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दहा रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

“महाराष्ट्रात आज एकूण १० ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सुमारे ६५ स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आमच्याकडे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी ३ लॅब आहेत. येत्या काळात नागपूर आणि औरंगाबादमध्ये आणखी लॅब उघडणार आहोत,” असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान, आज आढळलेले रुग्ण हे राज्यातील कोणत्या शहरातील आहेत, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

आतापर्यंत महाराष्ट्रात २०, राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण आढळून आला आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही ५ डिसेंबर रोजी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -