Friday, March 29, 2024
Homeदेशएकत्रित काम करा : अमित शहा

एकत्रित काम करा : अमित शहा

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद निपटून काढण्यासाठी सुरक्षा दलांना आवाहन

जम्मू (वृत्तसंस्था) : जम्मू जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशवादी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन अमित शहा यांनी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऑगस्ट २०१९मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर अमित शहा पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांनी यावेळी नागरिकांच्या हत्या आणि दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. श्रीनगरमध्ये शाह यांनी सुरक्षा दलांना नागरिकांच्या हत्या का होत आहेत असा प्रश्न उपस्थित केला. तसेच राजौरी आणि पूंछमध्ये दहशतवादी कारवाया का वाढत आहेत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना शक्य तेवढ्या लवकर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सांगितले.

तसेच कट्टरपंथीयांवर नियंत्रण ठेवण्याचंही काम करण्याचे पोलिसांना आवाहन केले.

तत्पूर्वी, श्रीनगरहून ते थेट नवगावला पोहोचले. इथे त्यांनी शहीद पोलीस निरीक्षक परवेज अहमद धर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी शहिद धर यांची पत्नी फातिमा यांना जम्मू काश्मीर प्रशासनात सरकारी नोकरी देण्याचे केवळ आश्वासन दिले नाही तर थेट नियुक्तीपत्र सोपवले.

मागील काही दिवसात कट्टरतावाद्यांकडून जम्मू काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांसह सुरक्षा दलावरही हल्ले झाले. यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर अमित शहा जम्मू काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

या दौऱ्यात जम्मू काश्मीरच्या नागरिकांत विश्वास निर्माण करण्याचा गृहमंत्री अमित शहा यांचा मानस आहे.

या दरम्यान ते खोऱ्यातील सुरक्षास्थितीचा आढावाही घेणार आहेत. दिल्लीतून श्रीनगर विमानतळावर दाखल झालेल्या अमित शहा यांच्या स्वागतासाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. तसेच यावेळी जम्मू काश्मीर प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -