लोकलमध्ये मिळणार वायफायची सुविधा

Share

मुंबई : मध्य रेल्वेने लोकल प्रवाशांसाठी नव्या वर्षाची भेट आणली असून, जानेवारी २०२२ पासून लोकलमध्ये प्रवाशांना आता वायफायची सुविधा मिळणार आहे. मुंबईतील एकूण १६५ लोकलमधील तब्बल ३ हजार ४६५ डब्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. आतापर्यंत प्रवाशांना केवळ रेल्वे स्थानकांमध्येच वायफायची सुविधा मिळत होती. मात्र, आता थेट प्रवासादरम्यान डब्यातही वायफाय मिळणार आहे.

लोकलमधील सर्वच प्रवाशांना वायफायचा सहज वापर करता यावा यासाठी वायफायसाठी सक्षम यंत्रणा बसवण्यात येणार आहे. लोकलमध्ये गर्दी झाल्यानंतरही वायफायची रेंज सर्व प्रवाशांना मिळावी यासाठी तयारी करण्यात येत आहे. खरे तर लोकलमध्ये प्रवाशांनी प्रवास सुरू केल्यानंतर त्यांच्या मोबाईलची रेंज निघून जाते. त्यांना मोबाईलवर बोलणेही शक्य होत नाही. असे होऊ नये यासाठी रेल्वेने आता लोकलमध्ये उच्च क्षमतेचा वायफाय राऊटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

हा प्रकल्प पूर्वीच येणे अपेक्षित होता. मात्र तो काही कारणास्तव रखडला होता. आता मात्र नव्या वर्षात तो पूर्ण करण्यात येत आहे. मध्य रेल्वे हे काम एका खासगी कंपनीकडून करून घेणार आहे. लोकलच्या प्रत्येक डब्यात वायफाय लावले जात आहे. ही उच्च क्षमतेची वायफाय सुविधा मोफत असेल का, याबाबत अद्याप रेल्वेने स्पष्ट केलेले नाही. रेल्वेची उत्पादन क्षमता वाढावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने नवनवे उपक्रम सुरू केले आहेत. याअंतर्गत लोकलच्या डब्यांमधील वायफाय सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.

Recent Posts

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

58 mins ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

2 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

2 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

3 hours ago

Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…

4 hours ago

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

5 hours ago