Tuesday, June 18, 2024
Homeक्रीडाWI vs NZ: वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडवर धमाकेदार विजय

WI vs NZ: वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडवर धमाकेदार विजय

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) २६व्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडवर धमाकेदार १३ धावांनी विजय मिळवला आहे. शेरफन रूदरफोर्डच्या नाबाद ६८ धावांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. मात्र न्यूझीलंड्च्या संघाला याचा पाठलाग करताना ९ बाद १३६ इतक्या धावा करता आल्या.

न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने ४० धावा करत सामन्यात झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्याला इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने न्यूझीलंडला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

याआधी पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाची अवस्था एकेकाळी ५८ धावांत ६ बळी गमावले होते. मात्र हळू हळू त्यांनी डाव सावरला. रुदरफोर्डने एक बाजू लावून धरली आणि संघाला दीडशेचा टप्पा गाठून दिला. पहिल्या टप्प्यातील तसेच मधल्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यानंतर रुदरफोर्डने खालच्या फळीतील फलंदाजांना साथीला घेत वेस्ट इंडिजला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

दुसरीकडे न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सनंतर मिचेल सँटनरने न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र या आशा फोल ठरल्या आणि वेस्ट इंडिजचा १३ धावांनी विजय झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -