Bollywood actress Sanya Malhotra : ‘ती’ सध्या काय करतेय?

Share

मुंबई : वैविध्यपूर्ण भूमिका, अनोख्या कथा आणि अभिनयाची उत्तम जाण असलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकते आहे. तिच्या अभिनयाला एक वेगळीच लय आहे हे ती प्रत्येक प्रोजेक्ट मधून दाखवून देते यात शंका नाही. तिच्या अस्सल व्यक्तिरेखा आणि निर्विवाद प्रतिभेसाठी ओळखली जाणारी ही एक बॉलीवूड अभिनेत्री नेहमीच नवनवीन भूमिकांना सहजपणे आपलंसं करून घेते.

अगदीच अल्पावधीत तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करून दंगल, बधाई हो, फोटोग्राफ, लुडो आणि पगलाईट यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या प्रभावी कामगिरीने रसिकांची मन जिंकली. कथलमधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची मनापासून प्रेम दिलं, कौतुक केलं.

भूमिका कुठलीही असो ती नेहमीच तिच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसते दंगलमध्‍ये सान्‍याने तिच्‍या कुस्‍तीत प्राविण्य मिळवण्‍यासाठी महिनोंमहिने प्रशिक्षण घेतले आणि तिच्‍या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झाले. पटाखा असो, लव्ह हॉस्टेल असो किंवा कथल असो, ती प्रत्येक पात्रातील बारकावे कॅप्चर करून तिची बोलीभाषा आणि देहबोली परिपूर्ण आत्मसात करून भूमिका साकारते. कथलमध्येही, जिथे तिने पहिल्यांदा पोलिसाची भूमिका केली होती सान्याने तिच्या पात्रा साठी सखोल संशोधन केले आणि पहिल्यांदा पोलिसांची भूमिका साकारली. अभिनयाच्या सोबतीने ती एक उत्तम डान्सर आहे.

सध्याच्या घडीला बॉलीवुड मध्ये सान्याचे काम हे टॉप लिस्ट वर आहे आणि म्हणून ती आगामी प्रोजेक्ट “जवान”ची जोरदार तयारी करताना दिसते ज्यामध्ये ती सुपरस्टार शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याव्यतिरिक्त ती सॅम बहादूर आणि मिसेस सारखे चित्रपट करणार आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…

8 seconds ago

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

2 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

3 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

4 hours ago

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

5 hours ago

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

6 hours ago