Weekly Horoscope: साप्ताहिक राशिभविष्य, १० मार्च ते १७ मार्च २०२४

Share

साप्ताहिक राशिभविष्य, १० मार्च ते १७ मार्च २०२४

आनंदी-उत्साही वातावरणाचा लाभ
मेष :

काही ग्रहांचे नैसर्गिक पाठबळ लाभल्याने आपल्यामध्ये नवा उत्साह संचारणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वृद्धी होऊन आपल्यासमोरील कामे आपण वेगाने पार पाडू नका. रखडलेली कामे वेळेत पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या गुंतवणुका आर्थिक फायदा मिळवून देतील. नवीन गुंतवणूक करताना सावध राहणे गरजेचे राहील. कोणाच्याही गोड बोलण्यास फसू नका. वैयक्तिक समारंभ होतील. निरनिराळ्या कार्यक्रमांची निमंत्रण मिळतील. आर्थिक बाजू बळकट होईल. तरुण-तरुणींच्या लग्नामधील अडसर दूर होऊन विवाहकार्य घडतील. तसेच काही विशिष्ट इच्छा-आकांक्षा असतील, तर त्या या कालावधीत पूर्ण होतील. आपला जीवनसाथी निवडता येईल. सरकारी कामे पूर्ण होतील. उत्साही राहाल.
तरुण-तरुणींचे विवाह ठरतील
वृषभ :

सुरुवातीपासूनच आपण पूर्ण आत्मविश्वासाने, उत्साहाने आपले कार्य पूर्ण करू शकाल. शुभग्रहांचे पाठबळ मिळेल. घेतलेले निर्णय अचूक ठरतील. त्याचा फायदा होईल. संशय दूर होतील. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. परमेश्वराची कृपा लाभेल. रेंगाळलेली सरकारी स्वरूपाची कामे हातावेगळी करू शकाल. स्थायी संपत्तीविषयक कार्य मार्गी लागतील. त्यात आपला पुढाकार असेल. आपल्या बुद्धिचातुर्याने धाडसी निर्णय घेत कामे पूर्ण करून शत्रूंवर मात कराल. विजय मिळवाल. आपल्या मतास प्राधान्य मिळेल. लोकप्रिय व्हाल. आपल्या कार्यक्षेत्रात पद, अधिकार, प्रतिष्ठा, सन्मान, प्रसिद्धी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल. परोपकारी वृत्ती राहील. धार्मिकतेत रस निर्माण होईल. प्रसिद्धीचे योग आहेत. नोकरीचे प्रश्न सुटतील.
कर्तृत्वाची साथ लाभेल
मिथुन :
सध्याचे ग्रहमान प्रगतीसाठी तसेच उन्नतीसाठी अनुकूल राहील. उद्योग व्यवसायात धडाडीने काम कराल. अपेक्षित पत्रव्यवहार घडेल. नव्या व्यवहारात उत्तम प्रगती साधू शकाल. नोकरीतही कर्तृत्वाची साथ लाभेल. आपले कार्य- कौशल्य कौतुकास्पद असेल. संततीची अभ्यासात प्रगती झालेली बघून समाधान वाटेल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहकार्य लाभेल. गुंतवणुकीतून फायदा होण्याचा संभव आहे. विद्यार्थ्यांना गुरुजनांचा सर्वस्व मार्गदर्शन मिळेल. मात्र इतरत्र वेळ घालवू नये तसेच कुसंगत टाळावे. वैवाहिक सौख्यात कुरबुरी चालू राहतील. जोडीदाराच्या प्रकृतीस्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. खर्चात वाढ होईल. कोर्टकचेरीच्या कामामध्ये लक्ष द्यावे लागेल. आपली बहुतेक क्षेत्रांतील कामे सफल होतील.
सामाजिक-धार्मिक क्षेत्रात रस
कर्क :

काही वेळेस काही घटना आपल्या मनाविरुद्ध घडतील आणि काही अप्रिय निर्णय स्वीकारावे लागतात. आपल्या म्हणून विरुद्ध काही घटना घडल्याने येणाऱ्या काळासाठी आपण मनात साशंक असाल. व्यवसाय-धंद्यासंबंधी काही समस्या असून त्या सोडवण्यासाठी आपल्याकडून फारसे काही होत नाही, असे वाटेल; परंतु आपण आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर व आत्मविश्वास व परमेश्वरावर विश्वास ठेवून या परिस्थितीवर दोन हात करू शकता. यश आपलेच आहे. मात्र धिम्यागतीने परिस्थितीत सुधारणा होऊन सफल व्हाल. कुटुंबातील धार्मिक कार्य आनंदाने पार पाडले. सामाजिक, धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. मानवा अधिकाराबाबत दक्ष राहा. प्रतिष्ठा वाढेल.
व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल
सिंह :

उद्योग-व्यवसायातील अडीअडचणींवर मार्ग काढण्यात यश मिळेल. मार्गदर्शन मिळेल. मदत मिळेल. त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करू शकाल. हितशत्रूंवर विजय मिळवाल. उत्साही व हरहुन्नरी राहाल. जास्तीचे कष्ट घेण्याची तयारी असेल. नवीन आव्हाने स्वीकारून जिद्द व चिकाटीने पुढे नेत मार्गक्रमण कराल. आपल्या कार्याची अथवा कार्यशैलीची प्रशंसा होईल. नोकरी-व्यवसायात आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे श्रमही वाढणार आहेत. व्यवसाय-धंद्यात उत्पन्न वाढेल. नातेवाईक व भावंडांचे सौख्य लाभणार आहे. प्रगती झाल्याने आपण आनंदी राहाल.
मंगलकार्य घडेल
कन्या :
कुटुंबात शुभकार्य होण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कुटुंबात मंगलकार्ये घडतील. कुटुंबात वातावरण आनंददायी राहील. कुटुंब परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सूचनांचा आदर आपण कराल. विविध खरेदी होईल. कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. विविध वस्त्रालंकार यासाठी खर्च होईल. सर्वांच्या मागण्या पूर्ण कराल. खर्च वाढला तरी विविध मार्गांतून धनआगमन होईल. हे दिवस आपणासाठी चैतन्याने भरलेले असतील. मुलांची विशेष काळजी घ्या. मित्र, नातेवाइकांकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळू शकतील. विरुद्धलिंगी व्यक्तीला आपणाविषयी आकर्षण वाटू शकते.
आनंददायी काळ
तूळ
:

या दिवसांत काही दिवस आपणासाठी सुखकारक असणार आहे. आपणाला आपल्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार आहे. आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण चांगले दिसावे यासाठी आपण प्रयत्नशील राहाल, त्यासाठी उपाययोजना कराल. अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. घरातील काही व्यक्तींच्या वागण्याने आपल्याला मनस्ताप होऊ शकतो. त्या व्यक्तीशी बोलून प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने हे दिवस आपणाला उत्तेजनापूर्ण असतील. नवीन उपक्रम, उद्योग हे आकर्षक आणि योग्य फायदा मिळण्यासाठी आशादायी असतील. आपणाला आपल्या जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळणार आहे.
संततीसौख्य मिळेल                                                                                      वृश्चिक :
कुटुंब-परिवारातील मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर सुवार्ता समजतील. त्यांचे अभ्यास व खेळ क्षेत्रात चांगली प्रगती होईल. शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळून उच्चशिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. त्या कामी गुरुजन व इतरांची मदत मिळू शकते. कुटुंबामध्ये एखादे धार्मिक कार्य होऊ शकते. त्यासाठी खर्च होईल. नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील, नोकरी-धंद्यानिमित्त मोठे प्रवास घडू शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर- सत्कार होईल; परंतु लहान-सहान कारणांवरून वाद- विवाद घडू शकतात, ते टाळावेत. संततीसौख्य मिळेल.
कामात बदल होईल
धनु :
आर्थिक स्थिती मजबूत राहील. विविध मार्गांनी धनलाभ होतील. मालमत्तेची कामे फायद्यात राहतील. आर्थिक लाभ संभवतो. व्यवसायात महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. नवीन करार होऊ शकतात. जुनी येणी वसूल होतील मात्र वाद-विवाद टाळा. थोडी काळजी घेणे आवश्यक राहील. कुटुंबात वातावरण चांगले राहील. मुलांकडून शुभ समाचार मिळतील. नोकरीत बदलीची किंवा कामात बदल होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. स्वतःच्या कामात अद्यावत राहा. वरिष्ठांची मर्जी टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज.
व्यवहार गतिमान होतील
मकर :

नोकरी-व्यवसाय-धंद्यानिमित्त जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग आहेत. प्रवासामध्ये आपल्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण आवश्यक राहील व आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा तसेच आपले वाहन सुरक्षित ठिकाणी ठेवा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे. भावंडांच्या भेटीगाठी होऊ शकतील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. काही वेळेस आपल्या मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मुलांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता. आपण शांतपणे निर्णय घेऊन वेळ पडल्यास मुलांशी चर्चा करून समस्या सोडवू शकाल. मुलांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास टाळा. आर्थिक फायदे होतील. जमीन-जुमला तसेच स्थावर संपत्ती याविषयीचे थांबलेले व्यवहार गतिमान होतील.
कौटुंबिक सुख मिळेल
कुंभ :

कौटुंबिक सौख्यासाठी आपणास हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास आपणास खरे समाधान मिळू शकेल. कुटुंबात सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्याने आपल्याला समाधान लाभेल. बोलण्यातून आत्मविश्वास दिसेल. कुटुंबात आपल्या मताला प्राधान्य दिले जाईल. आपले निर्णय योग्य ठरतील. नोकरी-व्यवसायात या अगोदर केलेल्या कामाचे फळ मिळेल. पदोन्नती, वेतनवृद्धीचे योग आहेत. मात्र बदलीची तयारी ठेवा. वरिष्ठ आपल्या कामावर खूश राहतील. एखादी विशेष प्रकारची नवीन जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. व्यवसायात रखडलेली रक्कम वसूल होईल. सहनशक्ती वाढवणे गरजेचे ठरेल. राग आवरा.
समाधान लाभेल                                                                                          मीन :
थोडी आर्थिक चणचण भासली तरी सप्ताह यशदायी असेल. काही महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल. विशेषत: संपत्तीविषयीचे थांबलेले व्यवहार गतिशील होतील. मोठ्यांचे मार्गदर्शन लाभू शकते. कलाकारांच्या कलेला वाव मिळून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी लाभतील. मानसन्मान मिळेल. समाधान लाभेल. आर्थिक प्राप्तीही वाढू शकते. व्यवसाय धंद्यात कोणतेही आर्थिक व्यवहार करताना दक्ष राहणे गरजेचे आहे. कोणावर अतिविश्वास ठेवणे नुकसानीस आमंत्रण देण्यासारखे होईल तसेच कुटुंबाप्रती आपल्या कर्तव्याबद्दल दक्ष राहा. कार्यव्याप्ती वाढल्यामुळे कुटुंबासाठी वेळ काढणे गरजेचे ठरेल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे. नाहक होणारा मनस्ताप टाळा.

Recent Posts

कमी पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो किडनीचा हा गंभीर आजार

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.…

2 hours ago

Google Pixel 8a भारतात लाँच, ही आहे किंमत

मुंबई: Google Pixel 8a भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक दमदार फीचर्स, जबरदस्त…

4 hours ago

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

11 hours ago

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…

12 hours ago

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

12 hours ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

13 hours ago