Share

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, दि. २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२३

अपेक्षित प्रगती होईल
मेष – महत्त्वाची कामे पूर्ण करता आल्यामुळे आपल्याला या आठवड्यामध्ये दिलासा मिळेल. समस्या संपुष्टात येतील. कुटुंबातील असलेले वाद-विवाद शमतील. विशेषतः वडिलोपार्जित मालमत्तेविषयी असलेले मतभेद संपून सर्वानुमते तोडगा निघेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा याकामी सहभाग असेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय राहील. एखादे शुभ कार्य घडू शकते. कुटुंब परिवारातील विद्यार्थ्यांकडून सुखकारक वार्ता कानी येतील. व्यवसाय, नोकरी क्षेत्रात अपेक्षित प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आतापर्यंत आपण आपल्या कार्यात दिलेल्या योगदानाचे कौतुक होऊन वेतनवृद्धी होईल.
नकारात्मकता दूर होईल
वृषभ – आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंब-परिवारात काही शुभ घटना घटित झाल्यामुळे निराशा आणि नकारात्मकता दूर होईल. सुख स्वास्थ्याचा लाभ मिळेल. आंतरिक समाधान मिळेल. मनाला आनंद आणि उत्साह वाढवणाऱ्या वार्ता मिळतील. सकारात्मकतेमध्ये वृद्धी झाली असेल तरी आपल्याला आपले प्रयत्न अविरत चालू ठेवून कार्यमग्न राहिले पाहिजे. आपल्या मनासारखे अपेक्षित यश मिळू शकते. कुटुंब-परिवारातील वातावरण स्थिर राहील; परंतु काही वेळेस दाम्पत्य जीवनात ताण-तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाद-विवाद टाळा. विद्यार्थ्यांनी कुसंगती टाळणे महत्त्वाचे ठरेल. प्रेमप्रसंगात जरा जपूनच पावले उचलावी लागतील.
मध्यस्थी फलद्रूप होतील
मिथुन –आपल्या रोजच्या जीवनात बदल घडल्याचे अनुभवण्यास मिळेल. अनुकूल ग्रहमान संरक्षक कवच उभारेल. परमेश्वराचा आशीर्वाद लाभल्याने येणारी संकटे परस्पर जातील; परंतु आपण आपल्या वर्तणुकीवर बोलल्यावर ती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कोणाचाही अपमान करू नका. काही वेळेस कुटुंब-परिवार, मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याबरोबर मतभेद संभवतात. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आत्मीक समाधान वाटून कृतकृत्य व्हाल. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. मनासारखा जोडीदार निवडता येईल. ओळखी मध्यस्थी फलद्रूप होतील.
महत्त्वाची कार्य पार पडतील
कर्क – आपल्यासमोरील कामे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. महत्त्वाची कार्य पार पडतील. जमीन-जुमला, स्थायी संपत्ती-मालमत्ता, खरेदी-विक्रीचे व्यवहार रेंगाळलेले होते, असे व्यवहार गतिमान होतील. ओळखी मध्यस्थी यशस्वी होऊन आर्थिक फायदा संभवतो. वडिलोपार्जित संपत्ती संबंधीच्या वाटाघाटी यशस्वी होतील. वास्तुविषयक व्यवहारात प्रगती आणि लाभ होईल. आपण जोपासलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना प्रयत्नात खंड पडू देऊ नका. कुटुंब, परिवारातील सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेनुसार मिळत राहील. विशेषत: भावंडे व पती-पत्नीचे सहकार्य मिळेल. त्याचप्रमाणे स्वतंत्र जागेत आपला व्यवसाय सुरू करण्यात यश मिळेल.
शुभयोगाची साथ-संगत लाभेल
सिंह – या आठवड्यात बदलत्या ग्रहमानानुसार आपल्याला शुभग्रहांचे पाठबळ लाभणार आहे. रोजच्या जीवनात शुभयोगाची साथ-संगत लाभेल. कुटुंब-परिवारातून तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातून शुभवार्ता मिळतील. गेल्या काही कालावधीमध्ये खराब अस्वास्थ्यामुळे अचानक झालेली वाढ आता कमी होऊन स्वास्थ चांगले राहील. चिंता मिटेल. विद्यार्थी शैक्षणिक प्रगतिपथावर असतील. त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. परदेशगमनाची शक्यता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उत्तम पर्व सुरू होऊ शकते. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
रेंगाळलेली कामे पूर्ण होतील
कन्या – या सप्ताहात आपल्या प्रगतीचा आलेख उंचावणारा आहे. आपल्या समोरील कार्य थोड्या प्रयत्नांनी पूर्ण होतील. विशेषतः दीर्घकाळ रेंगाळलेली कार्य पूर्ण करण्यात यश मिळेल. विशेषतः जमिनी, स्थायी संपत्तीविषयीची कामे गतीमान होतील. मात्र काही विचित्र घटना घटित झाल्यामुळे धावपळ करावी लागेल तसेच लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे हिताचे ठरेल. राहत्या घराविषयीचे प्रश्न असल्यास ते सुटतील. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवतील. तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. पती अथवा पत्नीचा भाग्योदय होईल. व्यवसाय धंद्यात नोकरीत प्रगतीकारक कालावधी आहे.
नवीन करार-मदार होतील
तूळ – आपली कर्तबगारी व बुद्धिकौशल्याने आपली कामे आपण करून घेणार आहात. प्रलंबित कार्य पूर्ण करताना त्यामध्ये राजकारणामुळे अथवा आपल्या शत्रूंच्या कारवायांमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या दूर करू शकाल. फक्त प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता आहे. काही वेळेस शुभ योगांच्या माध्यमातून अपेक्षित लाभ मिळतील. वडिलोपार्जित संपत्ती, मालमत्ता, जमीन-जुमला यांच्या संबंधित रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील वातावरण मिश्र स्वरूपाचे राहू शकते. परदेशी व्यापाराच्या संधी उपलब्ध होऊन नवीन करारमदार होतील.
तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील
वृश्चिक – अनपेक्षितरीत्या सकारात्मक घटना घटित होऊन अनुकूल त्यामध्ये वाढ झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. विशेषतः कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. नोकरीविषयक समस्या संपुष्टात येतील; परंतु त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. इतर कोणावरही विसंबून राहू नका. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. इतरत्र वेळ घालवणे महागात पडू शकते. उच्चशिक्षण घेता येईल. त्यासाठी लागणारे सहकार्य कुटुंबातून तसेच गुरूकडून मिळू शकते. नोकरीमध्ये वातावरण सर्वसामान्य राहील; परंतु राजकारण आणि गटबाजीपासून दूर राहा.
परदेशगमनाची संधी
धनु – या आठवड्यात आपल्याला उत्तमोत्तम संधी प्राप्त होतील, मात्र त्याचे सोने करणे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून राहील. आपल्यासमोरील कार्य गतिमान होतील. बरेच दिवस मनात घोळत असलेली एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होताना अनुभवाल. स्वतःच्या मालकीच्या घरात गृहप्रवेश करता येईल तसेच स्वतःच्या जागेत व्यवसाय-धंदा सुरू करण्याचे स्वप्नही साकार होईल. ओळखी तसेच मध्यस्थी यांच्याद्वारे मार्गदर्शन मिळेल. वडिलोपार्जित मालमत्ता संपत्तीविषयक असलेले मतभेद संपुष्टात येऊन सर्वमान्य तोडगा निघेल. नोकरीत स्वास्थ्य व समाधान लाभेल. आतापर्यंत केलेल्या कामाचे फळ मिळेल. परदेशगमनाची संधी मिळू शकते.
यश चकीत करेल
मकर – कुटुंब-परिवारात सतत सुवार्तांचा ओघ राहिल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहून समन्वय वाढेल. मात्र, वैवाहिक जीवनात वादविवाद टाळणे हिताचे ठरेल. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. विवाह योग कुटुंब, परिवारातील मुला-मुलींच्या विषयी त्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी येतील. नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील. नोकरी मिळेल. चालू नोकरीत प्रगती करू शकाल; परंतु आपल्या कामात अद्ययावत राहा. वरिष्ठांबरोबर मतभेद टाळा तसेच सभा-समारंभात मानपान तसेच लहान-सहान बाबींकडे दुर्लक्ष करा.
मान्यवरांचे सहकार्य मिळेल
कुंभ – प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कार्य पूर्ण करता येतील. विशेषतः सरकारी स्वरूपाची कामे ओळखी-मध्यस्थीतून पूर्ण होतील. त्यासाठी अपेक्षित असलेले सहकार्य इतरांकडून मिळेल; परंतु त्यासाठी खर्च करावा लागेल व वेळही द्यावा लागेल. तरुण-तरुणींच्या समस्यांचे निराकरण होईल. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. कुटुंब-परिवारात मंगल कार्याचे योग आहेत. साहित्य क्षेत्र तसेच कला विश्वातील जातकांचा मानसन्मान वाढून त्यांना यश आणि प्रसिद्धी मिळेल. समाजातील मान्यवरांचे सहकार्य मिळेल. स्वतःच्या वास्तूचे स्वप्न साकार होईल. नोकरीत वेतन वृद्धी मिळेल.
धार्मिक व मंगलकार्य घडेल
मीन – सदर कालावधी प्रगती करत असणार आहे. कुटुंब- परिवारातील वातावरण सुखद राहील. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या सहकार्यामुळे समस्यांवर मात करू शकाल. ज्येष्ठ व्यक्तींचा कृतिशील पाठिंबा मिळवण्यात यश मिळेल. परिवारात धार्मिक व मंगलकार्य घटित होतील. घरातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचा विवाह ठाण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाह निश्चित होतील. त्या कामी आप्तेष्ट व नातेवाइकांचे सहाय्य लावेल. अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते, मात्र या सगळ्या धावपळीमध्ये वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे. मानपानाचे नाट्यरंग होऊ शकते. तरुण-तरुणींना आपला मनपसंत जीवनसाथी निवडता येईल.

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

7 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

11 hours ago