Share

साप्ताहिक राशिभविष्य, दि. २४ ते ३० जुलै २०२२

अपेक्षित लाभ होईल
मेष – या सप्ताहात बाहेर कुठे फिरायला जाण्याचा मानस असेल. पण ऑफिसमध्ये जास्त काम असल्यामुळे मनासारखी सुट्टी घालवता येणार नाही. तसेच जेवढे ठरवलेले दिवस सुट्टीचे होते तेवढे मिळणार नाहीत. त्यामुळे मुले नाराज होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना आणि व्यावसायिकांना हा सप्ताह चांगला जाणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला निश्चित घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. सोशल मीडियावर जास्त व्यस्त असू नये. अविवाहित तरुणांचे विवाह ठरण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित लाभ होतील.
मेहनतीचे फळ मिळेल
वृषभ –या सप्ताहात शेअर बाजार वायदेबाजार तेजी-मंदी इम्पोर्ट-एक्स्पोर्टमधील व्यक्तींना धनलाभ होईल. आर्थिक प्राप्ती तसेच मोठे सौदे होऊ शकतात. छोट्या-मोठ्या व्यवसाय करणाऱ्यांचा प्रवास होऊ शकतो. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये घरातील व्यक्तींशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. मन:स्थितीमध्ये बिघाड होऊ शकतो. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. मन एकाग्र ठेवा. आपण स्वतः सकारात्मक विचाराने राहा. कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका. अर्थातच आपले मनोबल चांगले ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करालच. मेहनतीचे फळ आपणास मिळणार आहे.
आर्थिक नियोजन नीट करा
मिथुन – आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही राजकारणाला तोंड द्यावे लागणार आहे. त्याची तयारी असू द्या. स्पर्धक बलवान होतील. व्यवसाय धंद्यामध्ये परिस्थितीनुरूप काही बदल करणे गरजेचे ठरेल. पूर्वी केलेले नियोजन सफल होताना दिसेल. आर्थिक गोष्टीमध्ये खूप लक्ष देऊन काम करावयास पाहिजे. आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन व्यवस्थित असावयास पाहिजे. आर्थिक नियोजन नीट करा, तरच आपणास आर्थिक लाभ होतील. कुठल्याही गुंतवणुकीमध्ये विचारपूर्वकच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आपल्या घराच्या संबंधी तसेच मालमत्तेसंबंधी प्रश्न समोर येण्याची शक्यता आहे.
वादविवाद टाळा
कर्क – सरकारी नोकरी करणाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना इच्छित जागी बदली होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सातत्याने काम कराल, पण आपणास खूपच काम असणार आहे. कामाचा ताण येऊ देऊ नका. कामामध्ये अडचणी येण्याची संभावना आहे. आपण आपल्या कुशलतेने अडचणी दूर कराल. वैवाहिक आयुष्यामध्ये विनाकारण ताण येण्याची शक्यता आहे. वादविवादाची शक्यता आहे. वादविवाद टोकाला जाऊ देऊ नका. कुटुंबामध्ये अथवा आपल्या कार्यक्षेत्र लहान-सहान गोष्टींवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा.
वैवाहिक जीवनामध्ये मधुरता
सिंह – आपल्या दैनंदिन जीवनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. खाणे-पिणे यामध्ये लक्ष द्या. कोणत्याही प्रकारचे अनियमित जेवण करू नका. प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे जरुरी आहे. नोकरी व्यवसायात लक्ष देणे आवश्यक. जिथे वादावादी होऊ शकते तिथे होऊ देऊ नका. कुटुंबातील वातावरण चांगले असेल. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल. पती-पत्नीतील मतभेद संपुष्टात येतील. कौटुंबिक सुख मिळेल. आपला जोडीदार आपल्याशी सामंजस्याने वागणार आहे. त्यामुळे आपले लक्ष आपल्या कार्यक्षेत्रावर केंद्रित करून आर्थिक लाभ मिळवणे शक्य आहे.
प्रगती करण्याची संधी
कन्या – आपणास या सप्ताहामध्ये आपली प्रगती करण्यासाठी अनेक संधी मिळणार आहेत. या संधीचा आपण फायदा करून घ्या. प्रयत्नरत राहून कार्यशील राहणे महत्त्वाचे ठरेल. कलाकारांना तसेच खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कोणत्याही प्रकारे चांगली संधी हातातून जाऊ देऊ नका. कुटुंबातील वातावरण अतिशय चांगले असणार आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खूपच व्यस्त राहणार आहात. खूप काम असल्यामुळे आपल्याला थकवा येऊ शकतो.
महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल
तूळ – या सप्ताहामध्ये आपण आपल्या व्यापार व्यवसायातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कारणाने वादावादी होऊन, काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक मदतीची जरूर भासू शकते. बँकांसंबंधित कामे होतील. जे व्यावसायिक इम्पोर्ट-एक्स्पोर्टमध्ये आहेत त्यांना परदेशातून कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही शत्रूंशी जास्त नादी लागू नका. मानहानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे.
आत्मविश्वास वाढेल
वृश्चिक घरातील वातावरण सुधारणार आहे. काही सुखद अनुभव येण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक केलेल्या कार्यामध्ये सहजतेने यश येईल. सर्व कार्य सहजतेने पूर्ण व्हायला लागतील. आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर वाढणार आहे. नोकरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पण आपण याच काळात स्वतःला सिद्ध करू शकता. मोठी खरेदी होऊ शकते. व्यापार व्यवसायासाठी खूप धावपळ करावी लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आजारपण समोर येईल. त्यामध्ये बराच खर्च करावा लागेल.
बचतीचा फायदा होईल
धनु – आपणास या सप्ताहामध्ये आई-वडिलांचे सहाय्य मिळणार आहे. या कालावधीमध्ये आपण आपली बचत करू शकता. या बचतीचा आपणास भविष्यामध्ये खूप फायदा होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत भाग्याच्या भरवशावर बसू नका. आपले काम दुप्पटीने वाढवा. कुटुंबामधील काही महत्त्वाच्या प्रश्नांना मार्ग मिळत नव्हते, ते मार्ग आपल्या मुलांमुळे मिळतील. घरातील वातावरण चांगले राहील. महत्त्वाचे प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. आपण या कालावधीमध्ये शत्रूंवर विजय मिळवाल. प्रेमी-प्रेमिकांना आनंदाचे दिवस आहेत.
कार्यक्षेत्रात पुढे जाल
मकर – आपणास वडिलांचा सहयोग मिळणार आहे. आपल्या जीवनामध्ये आपण सकारात्मक विचारांना प्राधान्य द्याल. शेअर मार्केट, स्टॉक मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना नवीन गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यास करूनच करा. आपली दूरदृष्टी विचार व कुशल योजना यामुळे आपण आपल्या कार्यक्षेत्रात पुढे जात राहाल. आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असल्यास तो बदल करू शकता. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मात्र जबाबदारी वाढेल. घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये नूतनीकरण करण्याचा विचार कराल. व्यापार – व्यवसायात गुंतवणूक वाढवावी लागेल. त्याचे परिणाम चांगले होतील.
व्यावसायिक विकास होईल
कुंभ – व्यापार व्यवसायांमध्ये आपण धैर्याने व समजदारीने घेतलेले निर्णय आपल्याला यश मिळवून देणार आहेत. आपण नवीन व्यवसाय किंवा परदेशात गुंतवणूक करायची ठरवले असेल तरी आपणास चांगलेच यश येणार आहे. नवीन भागीदारीतील व्यवसाय सुरू करता येईल. व्यावसायिक नवे अनुबंध जुळून येतील तसेच व्यावसायिक जुनी नाती नव्याने प्रस्थापित होतील. स्वतःचा तसेच व्यावसायिक विकास होईल. आपल्या कार्यकुशलतेमुळे विकास होणार आहे. आपण आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या तऱ्हेने पूर्ण कराल. बहीण-भावामधील वाद संपवून त्यांच्याशी चांगले संबंध होतील.
नवीन मार्ग मिळेल
मीन – पती-पत्नीच्या नात्यामध्ये एक भावनात्मक वळण येईल. दोघं एकमेकांना खूपच समजून घेणार आहात. त्यामुळे जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. आपल्या कार्यक्षमतेमुळे आणि कष्टामुळे आपल्याला नवीन संधी मिळणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये सातत्याने काम केल्याचे फळ चांगलेच मिळणार आहे. आपले काम नीटनेटके केल्यामुळे कामांमध्ये आपले कौतुक होणार आहे. व्यापार-व्यावसायिकांना नवीन व्यवसाय करण्यासाठी नवीन मार्ग सापडतील. त्यातून होणारा फायदा आपणास प्रगतिकारक ठरणार आहे. व्यापारवृद्धी करण्यासाठी आपण जास्त मेहनत घ्याल.

Recent Posts

IT Raid : अबब! पलंग, कपाट, पिशव्या आणि चपलांच्या बॉक्समध्ये दडवलेले तब्बल १०० कोटी!

दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…

18 mins ago

Loksabha Election : देशात आणि राज्यात १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…

3 hours ago

HSC exam results : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या होणार निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्‍या…

4 hours ago

Yami Gautam : यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पावलांनी आला छोटा पाहुणा!

'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…

4 hours ago

Loksbaha Election : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १५.९३ टक्के मतदान!

जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…

5 hours ago

Eknath Shinde : राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार! उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…

5 hours ago