Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १९ मार्च ते २५ मार्च २०२३

Share

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, रविवार दि. १९ मार्च ते शनिवार दि. २५ मार्च २०२३

कौतुकास पात्र ठराल
मेष – मागील काही काळ जाणवणारी आर्थिक ओढाताण संपुष्टात येईल. पैशाअभावी रखडलेली कार्य मार्गी लागतील. नोकरीत, व्यवसायात आर्थिक फायदा चांगला होऊन बरेच दिवस मनात घोळत असलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. नोकरीत वेतनवृद्धी, पदोन्नती संभवते. कामाच्या स्वरूपातील बदलाचे व नवीन जबाबदाऱ्यांचे स्वागत करा. नवीन आव्हाने स्वीकारा. त्यामुळे कर्तृत्वास नवीन झळाळी मिळेल. पूर्वीच्या कामाचे फळ मिळेल. कौतुकास पात्र ठराल. आत्मविश्वासात भर पडून पुढील कार्य करण्यासाठी कार्यमग्न राहा. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा करून देतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घेणे आवश्यक.
परदेशगमनाची शक्यता
वृषभ – व्यवसाय धंद्यावर सरकारी धोरणांचा सम-विषम परिणाम होण्याची शक्यता. नोकरीत सहकारी, वरिष्ठांबरोबर मत-मतांतरे होऊ शकतात. वादविवाद घडू नयेत यासाठी विविध प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांच्या मतास उचित प्राधान्य द्या. सर्व क्षेत्रातील कार्य हातावेगळी करू शकाल. नोकरी-व्यवसायात कायदेशीर बाबी सांभाळा. महत्त्वाची कार्य पूर्ण करू शकाल. जमीन-जुमला, स्थावर मिळकत याविषयीचे रखडलेले व्यवहार गतीमान होतील. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधीचे वाद संपुष्टात येतील. घरातील मौल्यवान वस्तूकडे लक्ष ठेवा. चोरी अथवा नुकसानीचे भय. धनलाभाच्या संधी प्राप्त होतील. परदेशगमनाची शक्यता आहे.
विवाह निश्चित होतील
मिथुन –अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे उत्साही व आनंदी राहाल. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. काहींचे परिचयोत्तर विवाह होतील. व्यवसाय नोकरीत एखाद्या स्त्रीपासून फायदा होऊ शकतो. व्यावसायिक नवे करारमदार होऊ शकतात. विशेषतः परदेशी व्यापार वृद्धी योग, त्याचप्रमाणे परदेशगमनाचे योग. कुटुंबात मुला-मुलींकडून त्यांच्या विद्या अभ्यासातील प्रगतीच्या बातम्या मिळाल्यामुळे आनंदी राहाल. नवपरिणीतांना अपत्य योग. कुटुंब वृद्धी. व्यवसायामध्ये प्रतिष्ठा वाढेल. कलाकार व साहित्य क्षेत्रातील जातकांना यश मिळेल. स्पर्धकांवर मात कराल. विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागतील.
तडजोड फायद्याची ठरेल
कर्क – सध्याच्या कालावधीमध्ये अति महत्त्वाकांक्षा न बाळगता वाटचाल करणे फायदेशीर ठरणार आहे. तडजोड फायद्याची ठरेल. कुटुंब-परिवारामध्ये अथवा मित्रमंडळींच्या वर्तुळात छोट्या-छोट्या कारणांवरून वादविवादाची शक्यता. नाती दुरावण्याची शक्यता. वादविवाद टाळून त्यांना महत्त्व देणे फायद्याचे ठरेल. नोकरीत अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागण्याची शक्यता. स्वतःच्या बोलण्यावर तसेच वर्तणुकीवर नियंत्रण आवश्यक. भांडण टाळा. व्यवसाय-धंद्यात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. नोकरीत बदलीची शक्यता. काही वेळेस मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागण्याची तयारी ठेवा.
खात्रीपूर्वक निर्णय घ्या
सिंह – विशेषतः तरुण-तरुणींना भरघोस फळे मिळतील. आपले शिक्षण पूर्ण करून जे जातक नोकरीच्या शोधार्थ असतील, अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येऊ शकतो. चालू नोकरीतही चांगली फळे मिळतील. पदोन्नती, वेतनवृद्धीसारख्या घटना घटित होतील. मात्र बदलीची शक्यता आहे. व्यावसायिक परिस्थिती सुधारेल. कर्जातून मुक्तता. व्यवसायातील नियोजन सफल होईल. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याची संधी. खात्रीपूर्वक निर्णय घ्या. शिष्यवृत्ती मिळू शकते. भागीदारी व्यवसाय झपाट्याने पूर्ण कराल.
गौरवास्पद कामगिरी कराल
कन्या – आपण पूर्वी केलेल्या कार्याचा गौरव होऊन आपणास त्याचे बक्षीस मिळेल. व्यक्तिगत फायदा होऊन मानसन्मानास पात्र ठराल. नोकरीत अचानक एखादी चांगली घटना आपला उत्साह वाढवेल. पदोन्नती-वेतन वृद्धीचे योग संभवतात. आत्मविश्वासाने पुढील कार्य पार पाडाल. आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडेल. आपल्या वागण्याने अथवा बोलण्याने इतरांना दुखवू नका. नात्यांना जपा. कलाकार, खेळाडूंना सरकार दरबारी मान मिळू शकतो. आपल्या गुणांना वाव मिळून कौतुक होईल. व्यावसायिक परिस्थिती समाधानकारक राहील. कुटुंबात जरा सबुरीने घेण्याची आवश्यकता आहे.

धनप्राप्ती होईल
तूळ – सुरुवातीला खर्चात वाढ झाल्यासारखे वाटेल. त्यात काही अनपेक्षित खर्चही समाविष्ट असण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढू शकतात तसेच मुला-मुलींसाठी खर्च संभवतो. त्यांच्या शैक्षणिक बाबी खर्ची ठरतील. राहत्या घरातील सुख-सुविधा वाढविण्याकरिता खर्च करावा लागेल. नवीन खरेदी होईल, तर घरगुती खर्च संभवतात. त्याप्रमाणे वाहनाच्या देखभालीवर खर्च करावा लागेल; परंतु खर्चाच्या बाबी आपण सहन करू शकाल, कारण आपला आर्थिक स्त्रोतही वाढेल. जुनी येणी वसूल होतील. उधारी-उसनवारी वसूल होईल. धनप्राप्ती होईल.
मदत मिळेल
वृश्चिक – शुभ ग्रहांचे पाठबळ लाभल्यामुळे आर्थिक आलेख उंचावलेला अनुभवाल. नोकरी-व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. नेहमीच्या उत्पन्नांच्या मार्गांव्यतिरिक्त इतर मार्गांनी उत्पन्नात भर पडू शकते. सरकारी क्षेत्रातून मदत मिळू शकते. सरकारी अनुदानातून लाभ मिळू शकतो. सरकार दरबारी जर एखादं प्रकरण प्रवीष्ट असेल, तर त्या प्रकरणी यश मिळेल तसेच आर्थिक सहाय्य मिळू शकते. व्यावसायिक कर्ज मंजूर होतील. ओळखीच्या माध्यमातून मदत मिळेल मात्र असंगाशी संग ठेवणे महागात पडेल. अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो. वाहन वेगावर नियंत्रण आवश्यक राहील.
संमिश्र फळे मिळतील
धनु – काही प्रमाणात कडू तसेच गोड फळे चाखण्यास मिळतील. तरुण-तरुणींचा भाग्योदय होईल. नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील. प्रयत्न विशेष सफल होतील. त्याचप्रमाणे ओळखीमध्ये कामे पार पडू शकतात. कुटुंबात अथवा बाहेरील क्षेत्रात वादविवाद टाळा. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. व्यावसायिक वादग्रस्त येणी आल्यामुळे आश्चर्य वाटेल. विवाह जमतील. अपवादात्मक विवाहयोग. सरकार दरबारची प्रलंबित कामे पूर्णत्वाकडे जातील. कलाकार साहित्य क्षेत्रातील मंडळींना अनुकूल कालावधी. प्रसिद्धी संभवते.मानधनात वाढ होऊन नवीन कार्य हाती घ्याल.
प्रवास घडतील
मकर – जवळच्या व्यक्ती मातृत्वाच्या भावनेने आपल्याशी वागण्याची शक्यता आहे. समज-गैरसमज होण्याची शक्यता आहे. कोणीही काहीही आरोप केल्यास शांततेने घ्या. परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी हे आवश्यक ठरणार आहे. संबंधित स्त्रियांशी सौजन्यपूर्ण वागणूक आवश्यक आहे. प्रतिष्ठेचे विषयक समस्या निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृती जपा. कोणाच्या आजारपणाचा अथवा शस्त्रक्रियेचे योग आहेत. मानसिक व शारीरिक त्रासाची शक्यता. उत्तरार्धात काहीसे प्रतिकूल वाटणारे ग्रहमान बदलेल. काही चांगल्या शुभ घटना घट झाल्यामुळे मानसिकता सुधारेल. दिलासा मिळेल. प्रवास घडतील व सफल होतील.
धनलाभाचे योग येतील
कुंभ – अनुकूल परिस्थिती असली तरी सध्याच्या परिस्थितीचे शांतपणे अवलोकन करून मगच निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक आवक जरी येत राहिली तरी खर्चाचे प्रमाण वाढलेले अनुभवास येऊ शकेल. कुटुंब परिवारासाठी काही खर्च अपरिहार्य तर काही खर्च अचानक समोर उभे राहिल्यामुळे त्याची पूर्तता करावी लागेल. व्यवसायातील उलाढाल वाढलेली दिसून येईल. धनलाभाचे योग, आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगली पाहिजे. कारण मानवी उपद्रव संभवतो. कलाकारांना अनुकूल कालावधी. केलेल्या कामाचा गौरव होऊन मानसन्मान मिळेल. नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होईल.
व्यावसायिक लाभ होतील
मीन – व्यवसायात अधिक लाभ संभवतात. व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहून उलाढालीमध्ये वृद्धी होईल. जुन्या सहकाऱ्यांसमवेत व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होईल. भागीदारी व्यवसायात मतभेद नको. परिवारामध्ये विरोध वाढू शकतो. राजकारणात सक्रिय असलेल्या जातकांनी अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. आश्चर्यकारकरीत्या जवळचे लोक शत्रुत्वाने वागू शकतात. शत्रूंच्या कारवायांकडे नीट लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. विरोधकांच्या विरोधाला नवी धार चढल्याची जाणीव होईल. काही व्यक्तींच्या गाठीभेटी, मनस्ताप वाढू शकतात. अनामिक भीतीचा पगडा मनावर राहू शकतो. तरुण-तरुणींनी शक्यतो सावधगिरी बाळगावी.
Tags: horoscope

Recent Posts

Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! कडाक्याच्या उन्हात पाणीटंचाईचा प्रभाव

'या' भागातील चक्क १६ तास पाणीपुरवठा खंडित मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये उकाडा…

22 mins ago

Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ!

पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…

1 hour ago

Mumbai Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक

काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की…

2 hours ago

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

6 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

6 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

9 hours ago