कृणाल म्युझिकची लग्नगीतांची मेजवानी

Share

मुंबई : कृणाल म्युझिकने आजवर विविध प्रकारची गाणी तयार करून ती यशस्वीरीत्या रसिकांपर्यंत पोहचवली आणि रसिकांनीही त्याचे जोरदार स्वागत केले आहे. लग्नसराईच्या हंगामात बहारदार लग्नगीतांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना नेहमीच मिळत असते. येत्या हंगामासाठी हीच मेजवानी रसिकांना देण्यासाठी कृणाल म्युझिक दोन नवीन लग्नगीते घेऊन येत आहेत. ‘वडाला फुटलाय पान’ आणि ‘माझे नावाचा शालू लग्नात घालशील काय’ ही दोन धमाल गीते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

गायक अनिमेष ठाकूर आणि साक्षी चौहान यांच्या आवाजातील ‘वडाला फुटलाय पान’ हे गीत राज ईरमाली यांनी लिहिले असून डिजे गणेश यांनी संगीत संयोजन केले आहे. पारंपरिक बाजातील हे धम्माल लग्नगीत रसिकांना नक्की ताल धरायला लावणार आहे. दुसरं श्रवणीय गीत ‘माझे नावाचा शालू लग्नात घालशील काय’ हे लवकरच व्हिडिओरुपात कृणाल म्युझिक वर येत आहे. साहिल मोरे लिखित या गाण्याला चंद्रजीत कांबळे यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच स्वर विवेक नायर यांचे आहेत. नुकतेच या गीताचे चित्रीकरण पार पडले असून ते रसिकांना कृणाल म्युझिकवर लवकरच पहायला मिळणार आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट ग्रुपचे सीईओ श्री. सुशिलकुमार अग्रवाल म्हणाले की, ‘अल्ट्रा नेहमीच नवीन प्रतिभावान कलाकारांबरोबर काम करत विविध सांगितीक प्रकारांना प्रोत्साहन देण्याच्या संधी शोधत असते. रसिकांच्या आवडीनिवडी जोपासत निर्मिती करण्याकडे कायम आमचा कल असतो. ही दोन्ही गीते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Recent Posts

Hindu temples : मुंबईतील प्राचीन मंदिर बाबुलनाथ

कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…

6 hours ago

प्रेमकहाणी भाग-१

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…

6 hours ago

Drought : डोळे उघड माणसा…

विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…

6 hours ago

Mahabharat : महाभारत युद्धातील जेवण व्यवस्थेचे रहस्य

विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…

6 hours ago

साठवण…

विशेष : नीता कुलकर्णी गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची... आमच्या परीक्षा झाल्या की, आई वर्षभराच्या…

6 hours ago

Nostalgic song : हसता हुवा नुरानी चेहरा…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…

6 hours ago