डोईवर तुळस घेऊन महिला वारीत का चालतात?...

सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

आषाढी एकादशीच्या वारीत वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत.

या वारीत आपल्याला पुरुष वारकरी आपल्याला टाळ मृदुंग वाजवताना दिसतात तर महिला वारकरी मंडळींच्या डोक्यावर आपल्याला तुळस दिसते.

नक्की यामागे काय कारण आहे जाणून घेऊया ?

डोक्यावरील तुळशी वृंदावन विठ्ठल भेटीच ओढ दर्शवण्याच प्रतीक आहे.

तुळस फक्त एक वनस्पती नसून तिला हरिप्रिया म्हणजे विठ्ठलाची सखीदेखील म्हटलं  जातं

तुळस प्राणवायू देते आणि कार्बन कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. यामुळे आजूबाजूला हवेचं  शुद्धीकरण होतं .

तुळशीमुळे हवेतील जंतू कमी होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे महिलांच्या आरोग्याचं संरक्षण होतं