अगेव ही एक वनस्पती आहे जी उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढते. ही वनस्पती प्रामुख्याने मेक्सिको आणि अमेरिकेच्या काही भागांत आढळते.
अगेव या वनस्पतीमध्ये नैसर्गिक गोडपणा असतो आणि त्याचा उपयोग औषधी व खाद्यपदार्थांमध्ये होतो.
जखमा भरून काढण्यासाठी ,पचन सुधारण्यास,अँटीबॅक्टेरियल गुणधर्म,त्वचेच्या समस्या इत्यादींवर उपयोगी
अगेव पासून बनवले जाणारे अगेव सिरप (नेचरल स्वीटनर) हा साखरेचा पर्याय आहे. तो मधाप्रमाणे गोड असून डायबेटीस असलेल्या लोकांसाठी काही प्रमाणात योग्य मानला जातो.
मेक्सिकोमध्ये टकीला हा प्रसिद्ध मद्यपदार्थ अगेव पासून बनवतात.