अपार आयडी म्हणजे काय?

ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’ याचे लघुरूप म्हणजे ‘अपार’ (APAAR ID Card).

अपार आयडी कार्ड हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने सुरू केलेला एक उपक्रम आहे. 

देशभरातील विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड, त्यांच्या अचिव्हमेंट्स आणि क्रेडेन्शियल्स डिजिटल पद्धतीने संग्रहित करणारा १२ अंकांचा एक खास आयडी देते, 

यामुळे विद्यार्थ्यांचं इंटिग्रेटेड आयडेंटिफिकेशन सिस्टिम तयार होणार आहे.

apaar.education.gov.in या अधिकृत वेबसाईटवरही अपार आयडी बनवता येते. 

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची ही डिजिटल व्यवस्था आहे. 

अपार आयडी कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांसह त्याची पर्सनल डिटेल्सही असणार आहे. जसे की, विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप, वजन, उंची ई.

अपार आयडी कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांसह त्याची पर्सनल डिटेल्सही असणार आहे. जसे की, विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप, वजन, उंची ई.

अपार आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मार्कशीट, पदवी, प्रमाणपत्रे आणि एक्स्ट्रा करिकुलर आदी गोष्टी डिजिटल रुपात सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांची किमान वयोमर्यादा 5 वर्षे असावी लागते. यापेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी तयार केली जात नाही. तसेच, अर्जदार भारतीय नागरिक असावा लागतो.

कोणतीही शाळा किंवा शिक्षक पालकांच्या परवानगी शिवाय विद्यार्थ्यांचे अपार आयडी बनवू शकत नाही.

Click Here