मौनी अमावस्या म्हणजे नक्की काय?
माघ महिन्यात येणारी अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या.
‘मौन’ म्हणजे शांतता. या दिवशी
कमी बोलून आत्मचिंतन व
साधनेवर भर दिला जातो.
मौनी अमावस्येला स्नान, दान
आणि जप केल्याने पुण्य लाभते,
अशी श्रद्धा आहे.
गंगा, गोदावरी, नर्मदा यांसारख्या नद्यांमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते, असे सांगतात
या दिवशी अनेक साधू-संत मौन
व तपश्चर्येचे व्रत पाळतात.
दानधर्म केल्याने जीवनातील
अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे.
मौन पाळणे, ध्यान-धारणा करणे, गरजूंस मदत करणे लाभदायक मानले जाते.
आजच्या धावपळीच्या जीवनात शांतता, संयम आणि आत्मशुद्धीसाठी मौनी अमावस्या काळाची गरज आहे.
Click Here