हैदराबाद गॅझेट नक्की काय आहे ?
हैदराबाद गॅझेट हे निजाम राजवटीतील एक दस्तऐवज आहे.
हे मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी निगडित आहे.
मराठा-कुणबी नोंदींच्या संदर्भात मराठा आरक्षणासाठी याचा उल्लेख अनेकदा केला जातो.
या गॅझेटमध्ये जमिनीच्या नोंदी, रहिवासी माहिती, जात‑समुदायांची नोंद, महसूल‑व्यवहार यासारख्या माहितीचा समावेश आहे .
गॅझेटमध्ये मराठवाड्यातील ३६% लोकसंख्या “मराठा‑कुणबी” म्हणून दाखवलेली आहे .
महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटला कायदेशीर आधार म्हणून GR द्वारा मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे ज्या मराठा कुटुंबांची गॅझेटमध्ये कुणबी म्हणून नोंद आढळते, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.
कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ओबीसी आरक्षण मिळू शकते.
न्यायालयीन आदेशानुसार ऐतिहासिक पुराव्याची पुरेशी खात्री करूनच प्रमाणपत्र दिले जाईल .
Click here