कशामुळे अॅलर्जी होऊन अंगावर पित्त येते?  त्वचेवर लाल चट्टे, खाज आणि सूज येण्यामागची कारणे जाणून घ्या!

अंडी, शेंगदाणे, काजू, मासे, मांसाहार, स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा डाळ आणि तूर डाळ यांची अॅलर्जी असल्यास अंगावर पित्त उठू शकते

औषधांची अॅलर्जीही धोकादायक काही अँटिबायोटिक्स किंवा वेदनाशामक औषधांमुळे शरीरात अॅलर्जिक प्रतिक्रिया होऊन पित्त उठू शकते.

पाळीव प्राण्यांमुळेही होऊ शकतो त्रास कुत्रे, मांजरी किंवा इतर पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे अॅलर्जी होऊन त्वचेवर पित्त येऊ शकते.

थंड पदार्थांपासून सावध रहा थंड वातावरण, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, केक तसेच यीस्ट असलेले पिझ्झा आणि ब्रेड यांमुळे काहींना अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.

धूळ, प्रदूषण आणि केमिकल्स धूळ, प्रदूषण किंवा काही रासायनिक पदार्थांच्या संपर्कात आल्याने त्वचेवर पित्त उठण्याची शक्यता वाढते.

उष्णता देखील ठरू शकते कारण उष्ण वातावरण, गरम पदार्थ किंवा शरीराचे तापमान वाढल्याने काही व्यक्तींमध्ये पित्ताची समस्या उद्भवू शकते.

वारंवार पित्त येत असल्यास दुर्लक्ष करू नका! तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि अॅलर्जीचे नेमके कारण शोधून योग्य उपचार करा.