Labour Code : काय  आहेत नवे कामगार कायदे ?

ग्रॅच्युइटीमध्ये बदल किमान एक वर्ष काम करुनही मिळणार ग्रॅच्युइटी

ओव्हरटाईमचे नवे नियम किमान वेतनासोबत ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन अनिवार्य, ओव्हरटाईमसाठी जबरदस्ती नाही

कामाच्या दिवसांची नवी मर्यादा वर्षातील कामाचे दिवस : 240 ऐवजी 180 दिवस

नियुक्ती पत्र अनिवार्य प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्ती पत्र देणे बंधनकारक; पगार, कामाचे तास आणि जबाबदाऱ्या पत्रात स्पष्ट

देशभर एकसमान किमान वेतन केंद्र सरकार ठरवेल राष्ट्रीय किमान वेतन, कोणतेही राज्य यापेक्षा कमी वेतन देऊ शकत नाही

सर्व क्षेत्रांसाठी समान हक्क ESI कव्हरेज वाढले; वैद्यकीय विमा, मातृत्व आणि अपंगत्व लाभ, कामगारांना सरकारी संरक्षण

मीडिया व डिजिटल कर्मचाऱ्यांसाठी  OTT, पत्रकार, डिजिटल संपादक, कंटेंट क्रिएटर्स यांना औपचारिक नियुक्ती पत्र

वेळेवर वेतन देणे अनिवार्य सर्व क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना वेळेत पगार, पगार उशिरा दिल्यास कंपनीला दंड

अपघाताची नवीन व्याख्या कामावर जाताना/घरी येताना झालेला अपघातही रोजगार संबंधित दुर्घटना

वेळेवर आरोग्य निदान वय ४०+ कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, दरवर्षी किमान एक मोफत आरोग्य तपासणी