अहमदाबाद विमान दुर्घटनेत उरणच्या मैथिलीचा करुण अंत

रायगड जिल्ह्यातील उरण येथील २२ वर्षीय मैथिली पाटीलचा अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत मृत्यू

मैथिली एअर इंडियामध्ये हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होत्या

मागील दोन वर्षांपासून मैथिली एअर इंडियामध्ये हवाई सुंदरी होत्या.

अपघातग्रस्त विमानात मैथिली कर्तव्यावर होत्या

गुरुवारी सकाळी मैथिली लंडनला जाणाऱ्या विमानातील ड्युटीसाठी न्हावा येथील घरून निघाल्या होत्या.

सकाळी साडेअकरा वाजता मैथिलीने वडिलांना फोन करून अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाने प्रवास करणार असल्याचे सांगितले होते.

गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याचे समजताच मैथिलीचे नातलग विमानतळाच्या दिशेने रवाना झाले.