भारतातील पारंपरिक आणि प्रसिद्ध साड्या
बनारसी साडी –
जरी आणि रेशमी धाग्यांनी विणलेली, लग्न व सणांसाठी सर्वात लोकप्रिय पारंपरिक साडी.
कांजीवरम साडी –
तामिळनाडूत
विणली जाणारी, जाड सोनेरी बॉर्डर,
चमकदार रंगांची रेशमी साडी
पैठणी साडी –
सोन्याच्या धाग्यांनी विणलेली, मोराच्या डिझाइनसाठी प्रसिद्ध, महाराष्ट्राची पारंपरिक साडी.
बालुचरी साडी –
पश्चिम बंगालमधील साडी, ज्यावर पुराणकथांवर आधारित सुंदर डिझाइन विणले जातात.
पटोला साडी –
गुजरातमध्ये बनणारी, दोन्ही बाजूंनी सारखी दिसणारी रंगीत आणि नाजूक विणलेली साडी.
मुगा रेशीम साडी –
आसामची
सोनसळी रंगाची साडी, टिकाऊपणा नैसर्गिक चमक यासाठी प्रसिद्ध.
चंदेरी साडी –
मध्य प्रदेशातील हलकी, पारदर्शक आणि सौम्य चमक असलेली रेशमी-कापडी साडी.
फुलकारी साडी –
पंजाबची पारंपरिक साडी, रंगीबेरंगी धाग्यांनी भरतकाम केलेली सुंदर साडी
Click Here