आलिया भट्ट... 'Love & War' मध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत दिसेल (ऑगस्ट २०२६) याशिवाय ती 'तुंबाद २' (डिसेंबर २०२७) आणि 'ब्रह्मास्त्र २' मध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे.
किआरा अडवाणी... सुपरस्टार यशसोबत 'टॉक्सिक' या गँगस्टर चित्रपटात दिसणार आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये रिलीज होणारा हा ६०० कोटींचा सिनेमा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.
तमन्ना भाटिया... 'रागिनी ३' व्यतिरिक्त 'The Vvaan' (सप्टेंबर २०२६) मध्ये दिसेल. तसेच रोहित शेट्टीच्या 'मरिया आयपीएस'मध्ये आणि डिसेंबर २०२६ मध्ये अजय देवगणसोबतच्या चित्रपटात ती झळकणार आहे.
श्रद्धा कपूर... ऑगस्ट २०२६ मध्ये 'ईंठा' या चरित्रात्मक नाट्यपटात दिसेल. यासोबतच अलौकिक फ्रँचायझीवर आधारित 'नागिन' चित्रपटातही ती प्रमुख भूमिकेत असणार आहे.
जान्हवी कपूर... 'देवारा पार्ट २' (२०२७) मध्ये पुनरागमन करत आहे. तसेच टायगर श्रॉफसोबत 'लग जा गले' (मे २०२७) या अॅक्शन एंटरटेनर चित्रपटात ती दिसणार आहे.