लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात 

पहाटेपासूनच भक्तांची लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी 

स्वरांजली ढोल-ताशा पथकाच्या मानवंदनेने मिरवणुकीला सुरुवात 

राजा मंडपातून बाहेर पडताच हजारो भाविकांनी मोठा जल्लोष केला

गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तीमय वातावरणात मिरवणूक निघाली 

लालबागच्या राजाची शेवटची झलक पाहण्यासाठी संपूर्ण लालबाग परिसरात भक्तांची मांदियाळी 

संपूर्ण लालबाग परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण

जड अंतःकरणाने भाविकांचा लालबागच्या राजाला निरोप