लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

यंदा लालबागच्या राजाचे हे ९२ वे वर्ष आहे.  

यावर्षीचा राजा आणि त्याचा दरबार पाहण्यासाठी कैक भाविक अनेक दिवसांपासून आतुर होते.  

अखेर २४ ऑगस्टला लालबागच्या राजाच्या मूर्तीवरुन पडदा हटला, आणि त्याचे मनोहारी दर्शन सर्वांनी घेतले.

या वर्षी लालबागच्या राजाचा शाही थाट डोळ्याचे पारणं फेडणारा आहे. 

राजाचे सिंहासन, मुकुट आणि त्याचा पूर्ण दरबार सुवर्ण रंगात न्हाऊन निघाला आहे. . 

राजाचे आभूषण, आणि वस्त्रांना विशेष सजावट आणि आकर्षक रूप प्रदान करण्यात आले आहे.

यावर्षी राजाच्या भक्तांसाठी मंडपात भव्य आणि आकर्षक व्यवस्था करण्यात आली आहे.