मोबाईल वापरताना  डोळ्यांची अशी 'घ्या' काळजी 

दर 20 मिनिटांनी दूर असलेल्या  वस्तूकडे पाहा.  त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.

मोबाईलचा ब्राइटनेस खूप जास्त  किंवा खूप कमी ठेवू नका. मध्यम ब्राइटनेस डोळ्यांसाठी चांगला असतो.

डोळ्यांना कोरडेपणा येऊ नये म्हणून पापण्यांची उघडझाप करत राहा. 

डोळ्यांवर ताण येऊ नये म्हणून काळोखात मोबाईल वापरणे टाळा. 

डोळ्यांच्या संरक्षणासाठी  मोबाईलमध्ये असलेला ‘ब्लू लाईट फिल्टर’ किंवा ‘नाईट मोड’ ऑन करा. 

मोबाईल नेहमी डोळ्यांपासून  सुमारे 16–18 इंच दूर ठेवा.

दीर्घकाळ मोबाईल वापरणे टाळा.  मध्ये-मध्ये विश्रांती घ्या.

दररोज साधे डोळ्यांचे व्यायाम  केल्याने डोळे निरोगी राहतात.