फोनवर जास्त वेळ घालवता ? शरीरावर होणारे धक्कादायक परिणाम...
डोळ्यांवर ताण -
जास्त स्क्रीन टाइममुळे डोळे जळजळणे, धूसर दिसणे आणि डोकेदुखी वाढते.
मान आणि पाठदुखी -
फोन खाली पाहून वापरल्याने मानेच्या कण्यावर जास्त ताण येतो.
झोपेवर परिणाम -
फोनमधील ब्लू लाइटमुळे झोप उशिरा लागते आणि झोपेची गुणवत्ता कमी होते.
एकाग्रता कमी होते -
सतत नोटिफिकेशन्समुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता घटते.
मानसिक तणाव आणि चिंता वाढते-
सोशल मीडियावरची तुलना डिप्रेशनसारख्या समस्यांना कारणीभूत ठरते.
वजन वाढण्याचा धोका -
फोनमुळे शारीरिक हालचाल कमी होते, मेटाबॉलिझम मंदावतो.
हात आणि बोटांमध्ये वेदना -
सतत टायपिंगमुळे Thumb Pain आणि Carpal Tunnel चा धोका वाढतो.
सामाजिक नात्यांवर परिणाम -
फोनमुळे समोरच्या माणसाशी संवाद कमी होतो, एकटेपणा वाढतो.
Click Here