झटपट तयार होणाऱ्या रेसिपी 

वेळ वाचवण्यासाठी आधीच तयार  केलेल्या पिठात कांदा, कोथिंबीर, तीळ,  दही घालून पटकन थालीपीठ थापा

गरम पाण्यात ओट्स, चिरलेल्या  भाज्या आणि लिंबू पिळून अवघ्या ५ मिनिटांत चविष्ट उपमा तयार होतो

रवा आणि दह्याचे मिश्रण करून त्यात खाण्याचा सोडा घाला. आप्पे पात्रात ५ मिनिटांत गरमागरम आप्पे तयार करा

पोहे भिजवून त्यात शेंगदाणे, कढीपत्ता आणि हळद घालून वाफवून घ्या

 मुगाच्या डाळीचे पिठात आले-लसूण  पेस्ट आणि तिखट घालून डोसे बनवा.

बेसन, पाणी, मीठ, हळद, जिरे आणि  कांदा हे सर्व एकत्र करुन तव्यावर टाका

पातळ पोह्यांचा चिवडा दह्यासोबत खाणे  हा एक झटपट होणारा नाश्ता आहे