प्रसिद्ध व्यक्तींच्या
जीवनावर आधारित चित्रपट
डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्या
जीवनावर डॉ. काशीनाथ घाणेकर
(२०१८) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे
पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर भाई: व्यक्ती की वल्ली (२०१९) हा चित्रपट दोन भागांत बनवण्यात आला आहे
दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट कसा बनवला, या प्रवासावर हरिश्चंद्राचीफॅक्टरी (२००९) हा चित्रपट आहे
प्रसिद्ध गायक आणि नट नारायण
राजहंस यांच्या जीवनावर बालगंधर्व
(२०११) हा चित्रपट बनला आहे
सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षावर
मी सिंधुताई सपकाळ (२०१०) हा
चित्रपट आधारित आहे
वसंतराव देशपांडे यांच्या
जीवनावर आधारित मी वसंतराव (२०२२) हा चित्रपट आहे
भगवान दादा यांच्या आयुष्यावर एक अल्बेला (२०१६) हा चित्रपट बनला आहे
समाजकार्यावर आधारित
डॉ. प्रकाशबाबा आमटे – द रिअल हिरो (२०१४) हा चित्रपट आहे
डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या
जीवनावर आनंदी गोपाळ (२०१९)
हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे
लोकमान्य टिळकांच्या कार्यावर
आधारित लोकमान्य: एक युगपुरुष
(२०१५) हा चित्रपट आहे.
Click Here