जाणून घ्या मराठी भाषेचा थोडक्यात इतिहास

उगम कुठून झाला?

मराठी भाषेचा उगम प्राकृत आणि अपभ्रंश भाषांमधून झाला

प्राचीन काळातील मराठी

इ.स. ११व्या–१२व्या शतकात मराठीचे लिखित पुरावे आढळतात

यादव काळात मराठी प्रशासनात वापरली जाऊ लागली

संत साहित्याचा सुवर्णकाळ

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांनी मराठीला लोकभाषा म्हणून बळ दिलं

‘ज्ञानेश्वरी’ आणि अभंगांनी मराठी साहित्य समृद्ध केलं

शिवकालीन मराठी

महाराजांच्या काळात मराठी प्रशासनाची भाषा बनली

मोडी लिपीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता

ब्रिटिश काळ आणि आधुनिक मराठी

ब्रिटिश काळात छापखान्यामुळे मराठी साहित्याचा प्रसार झाला

‘दर्पण’सारख्या वृत्तपत्रांनी आधुनिक मराठीला दिशा दिली

आज मराठी ही भारतातील प्रमुख भाषांपैकी एक आहे

२७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गैरव दिन’ म्हणून साजरा केला जातो