जाणून घ्या : Hug Therapy म्हणजे काय?

एखाद्याला प्रेमाने मिठी मारल्याने  शरीरात सकारात्मक रासायनिक  बदल होतात. यालाच  “Hug Therapy” म्हणतात.

मिठी मारल्याने शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोन वाढतो. त्यामुळे मन शांत होतं, सुरक्षिततेची भावना निर्माण होते.

Hug केल्याने Cortisol  (ताण निर्माण करणारा हार्मोन)  कमी होतो. त्यामुळे एन्झायटी आणि  स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.

मिठी ही फक्त शारीरिक स्पर्श नाही;  ती विश्वास आणि आपुलकी व्यक्त करण्याचा मार्ग आहे.

संशोधनानुसार मिठीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाचे  आरोग्य सुधारते.

तज्ञांच्या मते, किमान २० सेकंदांची  घट्ट मिठी जास्त परिणामकारक ठरते.

मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी, वृद्धांमध्ये एकटेपणा कमी करण्यासाठी Hug Therapy उपयुक्त ठरते.