जाणून घ्या 'गुढीपाडव्याचं' महत्व आणि परंपरा
गुढीपाडवा म्हणजे
हिंदू मराठी नववर्षाचा दिवस.
हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे गुढी पाडवा.
या दिवशी गुढी उभारून नवीन संकल्पाने शुभकार्याचा प्रारंभ करण्याची परंपरा आहे.
या दिवशी ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली असल्याची धार्मिक मान्यता.
या शुभ दिवशीच भगवान विष्णूनी
प्रभू रामाचा अवतार घेऊन रावणासह
दुष्ट राक्षसांचा नाश केला.
दारासमोर रांगोळी घालावी.
तसेच, नवीन वस्त्रे परिधान करावीत.
देवांची पूजा करावी, दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे.
वेळूची काठी घेऊन, तिच्या टोकास
वस्त्र व फुलांची माळ घालून त्यावर
एक कलश ठेवावा.
सजवलेली गुढी दारासमोर रांगोळी घालून उभी करावी.
या दिवशी गुढीला बत्ताशांची माळही घातली जाते.
हिंदू संस्कृतीत या गुढीस 'ब्रह्मध्वज' असे म्हणतात.
Click Here