मुंबईतील राजाबाई टॉवरचा रंजक इतिहास ! 

सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांनी डिझाइन केलेले हे घड्याळ टॉवर १८७८ मध्ये बांधण्यात आले.

मुंबईतील फोर्ट येथे मुंबई विद्यापीठ कॅम्पसमध्ये असलेले हे घड्याळ टॉवर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा अविभाज्य भाग आहे .

प्रसिद्ध व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी हा टॉवर आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधला.

राजाबाई टॉवर विक्टोरियन गॉथिक आणि वेनिसियन वास्तुशैलीत बांधला आहे. 

घड्याळाची उंची ८५ मीटर असून, हा टॉवर एकेकाळी मुंबईतील सर्वोच्च इमारत म्हणून ओळखला जायचा.

टॉवरमधील घड्याळ सुरुवातीला १६ विविध ध्वनी वाजवत असे.

टॉवरमधील घड्याळ १४७ वर्षांपासून सुरु आहे . 

आजही हा टॉवर मुंबईच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचं प्रतीक आहे.

राजाबाई टॉवर सारखाच टॉवर लंडन येथे आहे , ज्याचे नाव  बिग बेन आहे .