अंडे चांगलं की खराब
हे कसे ओळखावे ?
ही माहिती तुमच्यासाठीचं
अंडे एका पाण्याने भरलेल्या भांड्यात टाका. जर अंड पूर्णपणे तळाशी गेलं तर ते चांगलं आहे.
अंडे जर पाण्याच्या वरती तरंगत असेल तर ते जुनं आहे किंवा खराब आहे.
ताजे अंडे फोडल्यावर पिवळा भाग गोलाकार आणि घट्ट दिसतो. तर पांढरा भाग चिकट आणि पारदर्शक दिसतो.
खराब अंड्याचा पिवळा भाग कमी गोलाकार व कधीही फुटू शकतो. तर पांढरा भाग खूप पातळ असतो.
खराब अंड्याला दुर्गंध येतो.
कानाजवळ अंडे हलवून बघावे जर पाण्याचा आवाज
आला तर अंड खराब आहे.
अंड्याचा पिवळा भाग हा पिवळा किंवा नारंगी असेल
तर ते अंड ताजं आहे.
अंड्याचा पिवळा भाग काळसर किंवा जास्त लालसर असेल तर अंड खराब झालेले आहे .
अंड्यामुळे प्रोटिन्स प्रचंड प्रमाणात मिळतात. पण खराब अंडी खाल्यास अपचन किव्हा जुलाब व उलट्या होऊ शकतात
हे पण पहा