उन्हाळ्यात केसांची अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात उष्णतेमुळे केसातील नैसर्गिक तेल कमी होते, त्यामुळे केस कोरडे व निस्तेज दिसतात.

बाहेर जाताना स्कार्फ, टोपी,दुपट्टा वापरा. यामुळे सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम कमी होतो.

घाम आणि धूळ केसांमध्ये साचते त्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा शॅम्पूने केस स्वच्छ ठेवा.

शॅम्पूनंतर कंडिशनर वापरा त्यामुळे केस मऊ आणि हायड्रेटेड राहतात.

नारळ, बदाम, आवळा तेल लावल्याने केसांना पोषण मिळतं आणि कोरडेपणा कमी होतो.

भरपूर पाणी प्या. शरीर हायड्रेटेड ठेवलं तर त्याचा परिणाम केसांवरही चांगला दिसतो.

हेअर ड्रायर, स्ट्रेटनर यांचा जास्त वापर टाळा. यामुळे केस अधिक खराब होऊ शकतात.

दही, अंडं, मेथी किंवा अ‍ॅलोवेरा वापरून घरगुती हेअर पॅक लावा.