हेल्दी रिलेशन टीप्स: कमी शब्दांत जास्त भावना कशा व्यक्त कराव्यात?

शब्दांपेक्षा भावना महत्त्वाच्या  छोट्या वाक्यांमधून प्रेम आणि आपुलकी व्यक्त करा.

सोपे आणि प्रामाणिक बोला कठीण शब्दांऐवजी मनापासून बोललेले साधे शब्द अधिक प्रभावी ठरतात.

कमी बोला, योग्य बोला प्रत्येक भावना लांबलचक वाक्यांत सांगण्याची गरज नसते. योग्य शब्द निवडा.

भावना दाखवा, फक्त सांगू नका "मला तुझी काळजी वाटते" हे सांगण्यापेक्षा कृतीतून दाखवणे अधिक परिणामकारक ठरते.

ऐकणंही महत्त्वाचं   कधी कधी समोरच्याचं शांतपणे ऐकणं हे हजार शब्दांपेक्षा जास्त बोलून जातं.

नजरेतूनही व्यक्त होतात भावना हसू, डोळ्यातील चमक किंवा एक साधा स्पर्श अनेक भावना व्यक्त करू शकतो.

भावना खरी असली की शब्द कमी पडत नाहीत. मनापासून बोललेले काही शब्दही आयुष्यभर लक्षात राहतात.