AC चा अतिवापर:
थंडावा की धोक्याची घंटा?
उन्हाळ्यात AC शिवाय राहणं कठीण वाटतं, पण त्याचा अतिवापर शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो.
AC मुळे हवेतला ओलावा कमी होतो, त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि खाज येणारी होऊ शकते
.
जास्त वेळ AC मध्ये राहिल्याने
सर्दी, खोकला आणि अॅलर्जीचा त्रास वाढू शकतो.
AC च्या थंड हवेमुळे डोळे कोरडे पडतात, जळजळ आणि लालसरपणा जाणवतो.
सतत थंड वातावरणात राहिल्याने बाहेरच्या उष्णतेशी शरीर जुळवून घेऊ शकत नाही.
जास्त वेळ AC मध्ये बसल्याने डोकेदुखी, आळस आणि थकवा
जाणवू शकतो.
थंड हवेमुळे स्नायू आणि सांधे कडक होतात, त्यामुळे वेदना वाढू शकतात.
उपाय म्हणून AC 24–26°C वर ठेवा, मध्ये-मध्ये बाहेरची हवा घ्या आणि पाणी जास्त प्या.
Click Here