पावसाळ्यात  या गोष्टींचा घ्या गरमागरम स्वाद  

पाऊस पडताना गरमागरम आल्याचा चहा पिणे आरोग्यदायी आणि आनंददायी असतो.

आले-चहा 

कांदा भजी, बटाटा भजी किंवा मिरची भजी, पावसाळ्यात यांची मजा काही औरच असते.

गरम भजी

गरमागरम आणि पौष्टिक कॉर्न सूप शरीराला उष्णता देते.

कॉर्न सूप 

हळद आणि आल्याचा वापर करून बनवलेले गरम मसाला दूध रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

मसाला दूध

हलके आणि पचायला सोपे सूप भूक भागवते.

शेवया/भाज्यांचे सूप 

न्याहारीसाठी गरम पोहे किंवा उपमा उत्तम पर्याय आहे.

गरम पोहे/उपमा

दही किंवा लोणच्यासोबत गरमागरम आलू पराठा खाणे स्वादिष्ट लागते.

आलू पराठा 

साधे पण पौष्टिक डाळ-भात गरमागरम खाल्ल्यास पचनास मदत होते.

डाळ-भात

पावसाळ्यात अनेकांसाठी मसाला मॅगी हा एक सोपा आणि आवडता पदार्थ आहे.

मसाला मॅगी

पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला मिळणारे लिंबू-मसाला लावलेले भाजलेले कणीस खाण्याची मजा वेगळीच असते.

भाजलेले कणीस