गणेशोत्सवासाठी नेमके २१ मोदक का अर्पण केले जातात तुम्हाला माहित आहे का ?

श्रीगणेशाला मोदक अतिशय प्रिय असल्याने त्याला मोदक अर्पण केले जातात.

२१ मोदक हे पंचमहाभूते आणि ५ ज्ञानेंद्रिये यांच्या १० अंकाचे प्रतीक आहेत.

मोदकाचे बाह्य आवरण 'सत्त्व', तर आतील सार 'रज आणि तम' यांचे प्रतीक आहे.

२१ ही संख्या ब्रह्मांडात असलेल्या २१ सूक्ष्म उर्जा स्तोत्रांचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे २१ मोदक अर्पण करून आपण २१ ऊर्जा स्त्रोतांचे स्वागत करतो.

२१ ही संख्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करते असे मानले जाते, म्हणून गणेशाला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.

गणपतीच्या २१ नावांचा उल्लेख अनेक मंत्रांमध्ये आढळतो, म्हणून प्रत्येक नावासाठी एक मोदक अर्पण केला जातो.

२१ या संख्येत, २ हे 'ज्ञान' आणि १ हे 'अद्वैत' दर्शवते, याचा अर्थ अद्वैत ज्ञानाने आपल्याला मोक्ष मिळतो.

२१ मोदकांचा प्रसाद सर्वांना वाटला जातो, त्यामुळे सामाजिक सलोखा आणि एकीभाव वाढतो.