'कॉफीबद्दल' या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? 

कॉफी हे कॅफिनयुक्त पेय आहे. जे भाजलेल्या कॉफी बियांना पाण्यात उकळवून तयार केले जाते.

कॉफीचा शोध इथोपिया येथे  झाला असून 15व्या शतकात ती येमेनमध्ये लोकप्रिय झाली.

17व्या शतकात बाबा बुदान  यांनी कॉफी भारतात आणली.

आज भारतात  कर्नाटक केरळ तामिळनाडू इथे कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. 

कॉफीचे मुख्य प्रकार अरेबिक – सौम्य व सुगंधी,   रोबस्टा– जास्त कॅफिनयुक्त, लिबेरिका- दुर्मिळ औषधी कॉफी 

कॉफीमुळे शरीरात ऊर्जा वाढते  यात अँटिऑक्सिडंट्सने प्रमाणही  भरपूर असते. 

जास्त कॉफी प्यायल्याने झोपेचा त्रास, हृदयाची धडधड वाढणे, अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या उध्दभवतात.  

दिवसाला 2–3 कप मर्यादित  प्रमाणात कॉफी पिणे हे कायम शरीराला फायदेशीर असते.