कोंड्याचा बंदोबस्त घरच्या घरी करा हे १० सोपे उपाय!

ऍपल सायडर व्हिनेगर (ACV)

ACV चा अ‍ॅंटिफंगल गुणधर्म कोंड्याचे जंतू नष्ट करतो. १:१ प्रमाणात पाणी व व्हिनेगर मिसळून स्कॅल्पवर लावा, १५ मिनिटांनी धुवा.

मेहंदी

मेहंदी केसांना थंडावा देते आणि स्कॅल्प साफ ठेवते. दही व लिंबासोबत मेहंदी मिसळून लावा व एक तासाने धुवा.

मेथीचे दाणे

रात्री पाण्यात भिजवून सकाळी पेस्ट करा. ती स्कॅल्पवर लावून ३० मिनिटांनी धुल्याने कोंडा कमी होतो.

दही

दही नैसर्गिक कंडीशनरप्रमाणे काम करतं आणि स्कॅल्पवरील फंगल इंफेक्शन दूर करतं. थेट केसांना लावून ३० मिनिटे ठेवा.

कडुलिंबाचा रस

कडुलिंब अ‍ॅंटिबॅक्टेरियल असून स्कॅल्पमधील खाज व कोंडा कमी करतो. रस काढून १५-२० मिनिटे स्कॅल्पवर लावा.

संत्र्याची साल

साल दहीसोबत वाटून लावा. ही मिश्रण अ‍ॅसिडिक असल्याने मृत पेशी दूर होतात आणि स्कॅल्प स्वच्छ राहतो.

अंड्यातील पिवळ बलक

यात प्रथिने व स्नेह असतो. स्कॅल्पला पोषण देऊन कोरडेपणा कमी करतो. २० मिनिटे ठेवून सौम्य शांपूने धुवा.

तुळशीची पान

तुळशी अँटिफंगल गुणांनी युक्त आहे. पानं वाटून त्यात थोडंसं पाणी घालून स्कॅल्पवर लावा. खाज आणि कोंड्यावर उपयोग.

ऑलिव्ह ऑईल

गरम करून स्कॅल्पवर मसाज केल्याने कोरडेपणा कमी होतो आणि कोंड्याची मुळे नरम होऊन सुटतात.

नारळाचे तेल आणि  लिंबाचा रस

नारळाचे तेल पोषण देतं, तर लिंबाचा अ‍ॅसिडिक गुणधर्म कोंडा कमी करतो. दोन्ही मिसळून कोमट करून स्कॅल्पला मसाज करा.