अशा प्रकारे साजरी करा पर्यावरणपूरक दिवाळी !

दिवाळी हा फक्त एक सण नाही तर तो श्रद्धेचे प्रतीक आहे. 

दिवाळीत लोक भरपूर फटाके फोडतात, त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. म्हणून पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करणे गरजेचे आहे. 

स्थानीय आणि हातमाग उत्पादने खरेदी करा. 

लाईटऐवजी मातीच्या दिव्यांचा वापर करून उर्जेची बचत करा.

घराची सजावट करण्यासाठी थर्मोकोल, प्लास्टिकऐवजी कागद, कापड, फुले, आणि नैसर्गिक साहित्य वापरा. 

तसेच पर्यावरणपूरक भेटवस्तू देऊनही दिवाळी साजरी करू शकता. झाडे, हाताने बनवलेल्या भेटवस्तू किंवा कपडे निवडा. 

मोठ्या आवाजाच्या फटाक्यांपासून लहान मुलं, वृद्ध आणि प्राणी त्रस्त होतात – हे लक्षात ठेवा.