बॉलीवुडचा
'ही-मॅन'
काळाच्या पद्याआड
धर्मेंद्र देओल -
सहा दशकांपासून चाहत्यांच्या
हृदयात कायमचे स्थान
मिळवणारा सुपरस्टार.
जन्म १९३५ मध्ये पंजाबच्या साध्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
Filmfare Talent Hunt
स्पर्धा जिंकून मुंबईत बॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्याची संधी मिळाली
त्यांचा पहिला चित्रपट
'दिल भी तेरा हम भी तेरे' (1960)
प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला.
धर्मेंद्र दिसायला देखणे, बेधडक,अत्यंत हरहुन्नरी होते.
उत्कृष्ट अभिनयामुळेच त्यांना बॉलीवूडमध्ये
'रोमँटिक हिरो'
म्हणून ओळख मिळाली.
फूल और पत्थर, गुड्डी, सत्यकाम
या चित्रपटातील दमदार अभिनयाने
प्रेक्षकांची मने जिंकून घेतली
'शोले'
मधील वीरूचे पात्र आजही चाहत्यांच्या मनात कायम घर करून आहे.
सिनेमांमध्ये केलेल्या अॅक्शन सीन्समुळे चाहते प्रेमाने
‘ही-मॅन ऑफ बॉलीवुड’
म्हणू लागले.
हेमा मालिनी
सोबतची
त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप लोकप्रिय झाली.
'चुपके चुपके'
सिनेमामधून त्यांची कॉमेडीही पाहायला मिळाली.
अॅक्शन, रोमँस, कॉमेडी प्रत्येक शैलीत आपली छाप उमटवली.
वृद्धपकाळात केलेली
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'
मधील भूमिका तरुण प्रेक्षकांनाही आवडली.
धर्मेंद्र यांना
पद्मभूषण, फिल्फेअरसह
अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
हा आपला लाडका
बॉलीवूडचा 'वीरू
'
२४ नोव्हेंबर २०२५
रोजी काळाच्या पडद्याआड गेला.
Click Here