अंकिता कुणालचा पहिल्या वटपौर्णिमेचेगुलाबी क्षण

अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांच्या वटपौर्णिमा निमित्ताने शेअर केलेल्या गोड गुलाबी फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच धूम माजवली आहे.

या फोटोंमध्ये त्यांचे प्रेम आणि एकमेकांवरील विश्वास स्पष्टपणे दिसून येतो.

अंकिता वालावलकरने वटपौर्णिम निमित्त सुंदर व्हिडिओ शूट केला आहे.

अस्सल मराठी लूकमध्ये अंकिताचा हा  वटपौर्णिमेचा लुक

बेबी पिंक कलर नऊवारी पैठणी, जरी वर्क केलेला क्रीम कलर ब्लाऊज, लाब मंगळसूत्र, हातात हिरव्यागार बांगड्या, नाकात साजेशी नथ, पायात सुंदर पैंजण, कंबरेला छल्ला, कानात सुंदर वेलांचे झुमके आणि केसांचा सुंदर अंबाडा असा लूक तिने केला आहे.

"नवरोबा आज माझ्यासोबत तुझाही उपवास आहे.... छान वाटलं मला.. खात्री आहे हे सगळं आयुष्यभर निभावशील ..... वटपौर्णिमच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!" असे तिने पोस्ट मध्ये लिहिले आहे.

तिने नेसलेल्या साडीच्या पदरावर सुंदर वडाच्या झाडाची एम्ब्रॉयडरी केलेली दिसते.