सिलसिला ये चाहत का...  कपाळी कुंकू अन् पांढऱ्या साडीवर ऐश्वर्या रायचा घायाळ करणारा लूक

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहण्याची सर्वांना एकाचं अभिनेत्रीची उत्सुकता असते ती म्हणजे  ऐश्वर्या राय बच्चन. 

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने पारंपरिक भारतीय लुक परिधान केला

मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली बनारसी साडी परिधान केली होती.

या साडीला सोनेरी आणि चंदेरी रंगाचा पदर दिसून आला.

ऐश्वर्याने ५०० कॅरेटचे डायमंडचे दागिने परिधान केले होते. 

ऐश्वर्याने भांगेत कुंकू भरलं आहे. यामुळे ऐश्वर्याने 'ऑपरेशन सिंदूर'विषयी आदर प्रकट केला आहे, अशी चर्चा आहे. 

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांवर ऐश्वर्याने हे कुंकू भरुन पूर्णविराम दिला आहे. 

ऐश्वर्याचा हा लूक पाहून तिचे चाहते तिला खऱ्या अर्थाने 'कान्सची राणी' असं म्हणत आहेत.