अष्टविनायक गणपतींचं आध्यात्मिक दर्शन 

मोरगाव - श्री मोरेश्वर अष्टविनायक यात्रेची सुरुवात या गणपतीच्या दर्शनाने होते.

सिद्धटेक - श्री सिद्धिविनायक भीमा नदीच्या काठी असलेलं हे मंदिर 'सिद्धी' प्रदान करणारं मानलं जातं. 

पाली - श्री बल्लाळेश्वर बालक भक्त बल्लाळच्या भक्तीने प्रसन्न होऊन बाप्पाने येथे वास केला.

महड - श्री वरदविनायक हे मंदिर 'वरदान' देणारा गणपती यासाठी प्रसिद्ध आहे.

थेऊर - श्री चिंतामणि चिंतामणि म्हणजे "चिंता हरण करणारा". येथे बाप्पा रिद्धी-सिद्धीसह विराजमान आहेत.

लेण्याद्री - श्री गिरिजात्मज हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जे डोंगरात गुहेमध्ये आहे. इथे पार्वतीने बाप्पाला पुत्र रूपात प्राप्त केलं, म्हणून 'गिरिजात्मज'.

ओझर - श्री विघ्नेश्वर विघ्नांचा नाश करणारा! इथे बाप्पाने 'विघ्नासुर' या राक्षसाचा पराभव केला होता. त्यामुळे हे मंदिर 'विघ्नेश्वर' नावाने प्रसिद्ध आहे.

रांजणगाव - श्री महागणपती रांजणगावचा महागणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.

Click here