शेवग्याच्या शेंगा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि आतड्या साफ करण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यासाठी शेवग्याच्या शेंगांच सूप तुम्ही नेहमी प्यायला हवं.
निरोगी पचन
पोटदुखी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर होण्यास मदत होते.
गरोदर महिलांसाठी फायदेशीर
शेवगाच्या शेंगांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे गरोदर महिलेच्या शरीरात दुधाची पातळी नियंत्रीत राहते.
ब्लड शुगर होते कमी
डायबिटीस रूग्णांकरता शेवगाच्या शेंगा फायदेशीर आहेत. यामुळे रक्तातील शुगर लेवल नियंत्रणात राहते.
इम्यूनिटी वाढते
शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने इम्यूनिटी मोठ्या प्रमाणात वाढते. यात Vitamin C असल्याने व्हायरल इंन्फेक्शन सारखे आजार दूर होतात.
हाडे मजबूत करते
शेवग्याच्या शेंगात आवश्यक खनिजे कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरसचा स्त्रोत असल्याने वाढत्या मुलांची हाडे मजबूत होतात.
त्वचेकरता फायदेशीर
शेवग्याच्या शेंगात असलेल्या कोलेजेन प्रोटीन त्वचेच्या मोठ्या छिद्रांवर देखील परिणाम करते आणि त्वचा मऊ करते.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
ड्रमस्टिक्समध्ये असलेले पोषक घटक व्हिटॅमिन ए असतात, जे डोळ्यांचा ताण टाळतात आणि स्पष्ट दृष्टी वाढवतात.
शरीराला ऊर्जा देते
ड्रमस्टिक्सचा तूमच्या आहारात समावेश केल्याने तुमच्या शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते.
लठ्ठपणा
वाढते वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या भाजीचे सेवन करणे अतिशय लाभदायी ठरते.