Friday, June 14, 2024
Homeमहत्वाची बातमीपाणी शुद्धतेची तपासणी आता महिलांकडून

पाणी शुद्धतेची तपासणी आता महिलांकडून

प्रशिक्षणाला सुरुवात

पालघर :जिल्ह्यातील प्रत्येक महसूल गावात शाश्वत शुध्द पाणी पुरवठ्यासाठी जल जीवन मिशन योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे पाणी शुद्धतेची तपासणी गावातील महिला स्वत: करणार आहेत. याबाबत प्रत्येक गावातील ५ महिला व जल सुरक्षक यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील ८८६ महसूल गावात प्रत्येकी ५ महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११,७२७ पाणी स्त्रोतांची तपासणी होणार आहे. जल जीवन मिशन योजने अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे ध्येय आहे. शरीरात पाणी शुद्ध गेले तरच आरोग्य चांगले राहते. त्यातच जिल्ह्यात जल जीवन मिशनची कामे वेगात सुरू झाली आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एक किट खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये २० मिली लहान काचेची बाटली आहे. या बाटलीमध्ये स्त्रोताचे पाणी भरून सामान्य तापमानात ४८ तास ठेवावी लागणार आहे. या बाटलीतील पाण्याचा रंग आहे. तसाच राहिला तर ते पिण्यास योग्य आहे. बाटलीतील पाण्याचा रंग काळा झाला तर पाणी पिण्यास अयोग्य आहे, हे स्पष्ट होणार आहे.

महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी होणार आहे. तसेच तपासणी झाल्यानंतर त्याच्या अहवालाची नोंद केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर ग्रामपंचायतीमधील डेटा इन्ट्री ऑपरेटर हे घेणार आहेत. पाण्याची तपासणी करता नमुना घेताना महिला प्रत्यक्ष पाण्याच्या स्त्रोताजवळ जाणार आहेत. त्यामुळे संबधित ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास ग्रामपंचायतीला कळवून स्त्रोतांची स्वच्छताही करून घेणार, असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन विभागाकडून देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -