रविवारी पहा ‘बहुरूपी अशोक सराफ’

Share

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अशोक सराफ यांच्या वयाचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘बहुरूपी अशोक सराफ’ हा कार्यक्रम रविवार ३ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर दाखवण्यात येणार आहे.

अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांना विनोदाचा बादशहा म्हणून ओळखले जाते. अशोक सराफ यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.

वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाही त्यांच्यात असलेली ऊर्जा, त्यांच्यात असलेला दिलखुलासपणा, अचूक विनोदाचे टायमिंग, कामात असलेली स्थिरता, अभिनयाविषयी असलेले प्रेम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

अशोक मामांचा हा यशस्वी प्रवास मोठ्या थाटामाटात एका सोहळ्याच्या रूपात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात अशोक मामांचा दिग्गजांकडून झालेला कौतुक सोहळा आणि त्याच सोबत काही रंजक सादरीकरण देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. जितेंद्र, एकता कपूर, सुनील गावस्कर यांनी देखील उपस्थिती दर्शवली.

Recent Posts

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

2 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

2 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

3 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

4 hours ago

Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…

5 hours ago

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

6 hours ago